(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ankylosing spondylitis : तरूणांमध्ये आढळणारा Ankylosing spondylitis म्हणजे काय? जाणून घ्या लक्षणं आणि उपचार
Ankylosing spondylitis : हा आजार म्हणजे सुरुवातीच्या टप्प्यावर अगदी लक्षातही येऊ नये इतक्या धीम्या गतीने बळावणारे पाठीच्या खालच्या भागाचे दुखणे.
Ankylosing spondylitis : अँकिलोझिंग स्पॉन्डिलायटिस. नावावरून कदाचित तुम्हाला याबद्दल कल्पना नसेल. पण, हे आहे पाठीच्या खालच्या भागाचं दुखणं. सुरुवातीच्या टप्प्यावर अगदी लक्षातही येऊ नये इतक्या धीम्या गतीने बळावणारे पाठीच्या खालच्या भागाचे दुखणे. अशी पाठदुखी तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ सुरू रहिली तर एखाद्या विशेषज्ज्ञाची, आणि या बाबतीत एखाद्या संधीवात तज्ज्ञाची म्हणजेच ह्रमॅटोलॉजिस्टची भेट घेणे महत्त्वाचे ठरते.
रोजच्या धावपळीच्या जीवनशैलीत अनेकदा आपण आपल्या तब्येतीवर लक्ष देणे टाळतो. अनेकदा आपल्याला साधं पाठीचं आणि दाहकारक स्थितीमुळे उद्भवलेली पाठदुखी यातला फरक माहीत नसतो. ए.एसशी संबंधित पाठदुखी ही इन्फ्लेमेटरी म्हणजेच दाहकारक स्थितीमुळे उद्भवणारी असते. आपली रोगप्रतिकारशक्ती जेव्हा पाठीच्या मणक्यांतील सांध्यांवर हल्ला करते तेव्हा ही स्थिती उद्भवते. भारतामध्ये अंदाजे 69 टक्के रुग्णांची हृमॅटोलॉजिट्सशी भेट होण्याआधी त्यांच्या आजाराचे चुकीचे निदान केले जाते. यावर वेळीच निदान होणे गरजेचे आहे.
या संदर्भात, डॉ. प्रविण पाटील, हृमॅटोलॉजिस्ट म्हणाले, “सकृतदर्शनी कोणतेही कारण नसताना आपली यंत्रणा अतिसक्रिय होते आणि चुकून आपल्याच निरोगी उतींवर हल्ला सुरू करते. यामुळे पाठीच्या मणक्यातील सांध्यांना सूज येते. यामुळे डोळे, त्वचा आणि आतड्यांवरही परिणाम होऊ शकतो. उपचार न मिळाल्यास सांध्यांना कायमची इजा पोहोचू शकते.”
एएसची स्थिती बळावू नये यासाठीचे काही उपाय :
हृमॅटोलॉजिस्टबरोबर सल्लामसलत करणे : ए.एस हा बरा न होणारा आजार आहे. त्याचे लवकर निदान होण्यासाठी या स्थितीची चिन्हे आणि लक्षणे समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. बहुतेक रुग्ण हृमॅटोलॉजिस्टकडे जाण्याआधी आपल्या नेहमीच्या डॉक्टरांकडे किंवा हाडांच्या डॉक्टरांकडे जातात.
नियमित उपचार : एकदा का या आजाराचे निदान झाले की, त्याची लक्षणे गंभीर होऊ नयेत आणि वेदना सुसह्य व्हाव्यात यासाठी अचूक उपचारांची मदत होऊ शकते. आजाराने गंभीर स्वरूप धारण करू नये आणि कोणतीही अतिरिक्त गुंतागुंत उद्भवू नये यासाठी उपचार गरजेचे आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Health Tips : महिलांमध्ये आढळणारा Irritable bowel syndrome म्हणजे काय? जाणून घ्या लक्षणं आणि उपचार
- Health Tips : मासिक पाळी दरम्यान होणारी पोटदुखी होईल कमी; ट्राय करा हे घरगुती उपाय
- Health Tips : उकाड्यामुळे एसीमध्ये झोपायची सवय लागलीये? जाणून घ्या काय होतील याचे दुष्परिणाम...
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )