एक्स्प्लोर

मोठी बातमी! एसटी महामंडळात 17,742 पदांची कंत्राटी भरती, परिवहन मंत्र्यांनी विधानसभेत दिली माहिती

एसटी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत मंत्री सरनाईक यांची काल सकारात्मक चर्चा झाली.

मुंबई : एसटी (ST) महामंडळात 17,742 ड्रायव्हर, कंडक्टर (Job) आणि कर्मचाऱ्यांची कंत्राटी भरती केली जाणार आहे. महामंडळाच्या ताफ्यात नव्याने येणाऱ्या 8300 बसेससाठी ही कंत्राटी भरती केली जाईल. नियमित कर्मचाऱ्यासाठी अर्थ खात्याकडे अर्ज पाठविण्यात आल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक (Pratap sarnaik) यांनी दिली. मात्र, तोपर्यंत या बसेस चालाव्या म्हणून ही कंत्राटी पद्धतीने भरती करावी लागत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सामान्य प्रवाशांना उत्तम सेवा देणे हेच एसटीचे तसेच सर्व कर्मचाऱ्यांचे अंतिम उद्दिष्ट आहे. त्यामुळे काम करताना चालक-वाहकांना भेडसावणाऱ्या दैनंदिन अडचणी, आगारस्तरावरील निर्णयप्रक्रिया तसेच शिस्तभंग कारवाईच्या बाबतीत न्याय्य आणि पारदर्शक पद्धतीने काम करण्याचे निर्देशही सरनाईक यांनी कर्मचारी संघटनेच्या बैठकीतून दिले आहेत. 

एसटी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत मंत्री सरनाईक यांची काल सकारात्मक चर्चा झाली. यावेळी, एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी प्रताप सरनाईक यांनी विधान भवनात सोमवारी महत्त्वपूर्ण बैठक बोलावली होती. त्यानंतर, आज विधानसभेत बोलताना त्यांनी नव्याने कंत्राटी भरती केली जाणार असल्याचे सांगितले. लवकरच मुंबईत 30 स्लिपींग कोच बसेस असतील तर 170 बैठ्या खुर्च्यांच्या वोल्वो बसेसही दाखल होती, या दोन्ही प्रकारच्या बसेस मुंबईसाठी मागविण्यात आल्या आहेत. महामंडळाच्या ताफ्यात आम्ही लवकरच 8300 बसेस समाविष्ट करणार आहोत. त्यासाठी, एसटी महामंडळात 17,742 ड्रायव्हर, कंडक्टर आणि कर्मचाऱ्यांची कंत्राटी भरती केली जाणार आहे. महामंडळाच्या ताफ्यात नव्याने येणाऱ्या 8300 बसेससाठी ही कंत्राटी भरती केली जाईल, असे सरनाईक यांनी विधानसभेत बोलताना सांगितले. 

महायुती सरकारने एसटीतील प्रवाशांबाबत गेल्या काही महिन्यांपासून अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी 75 वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन सेवेच्या बसेसमधून मोफत प्रवास करता येईल, अशी घोषणा केली होती. यानंतर राज्यातील महिलांना हाफ तिकिटात एसटीचा प्रवास करता येईल, अर्थात अर्ध्या तिकिटात महिलांना प्रवास करण्याची मुभा दिली. यानंतर आता एसटीच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना यापुढे पत्नीसह वर्षभर मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती मंत्री सरनाईक यांनी दिली.

5012 सहायक्क प्राध्यापक पदांची भरती

उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अंतर्गत असलेल्या अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक संवर्गातील एकूण रिक्त 11,918 पदांपैकी 5012 पदांची भरती करण्यासही मान्यता देण्यात आली आहे, अशी माहीती मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिली. 

हेही वाचा

मोठी बातमी : महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांची मोठी भरती, तब्बल 5012 पदं भरणार, चंद्रकांत पाटलांची मोठी घोषणा

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

शिंदे-फडणवीसांनी चूक सुधारावी, अन्यथा कधी न बघितलेले दिवस बघावे लागतील; मनोज जरांगे पुन्हा भडकले
शिंदे-फडणवीसांनी चूक सुधारावी, अन्यथा कधी न बघितलेले दिवस बघावे लागतील; मनोज जरांगे पुन्हा भडकले
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
न्यायालय एकनाथ शिंदेंच्याच बाजूने निर्णय देणार, धनुष्यबाण पेलण्याची ताकद फक्त शिंदेंसाहेबांमध्येच, बच्चू कडूंचा दावा
न्यायालय एकनाथ शिंदेंच्याच बाजूने निर्णय देणार, धनुष्यबाण पेलण्याची ताकद फक्त शिंदेंसाहेबांमध्येच, बच्चू कडूंचा दावा

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget