एक्स्प्लोर

West Bengal : भाजपची पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात उमेदवार ठरला 

West Bengal BJP Candidates 2026 List: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं पहिली यादी जाहीर केली आहे

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं पहिली यादी जाहीर केली आहे. भाजपनं पहिल्या यादीत 144 उमेदवारांची नावांचा समावेश केला आहे.भाजपनं विधानसभा विरोधी पक्षनेते शुभेंदू  अधिकारी आणि दिलीप घोष यांच्या नावाचा पहिल्या यादीत समावेश केला आहे. शुभेंदू अधिकारी यांना नंदीग्राम आणि भवानीपूर विधानसभा मतदारसंघातून भाजपनं उमेदवारी दिली आहे. ममता बॅनर्जी भवानीपूर विधानसभा मतदारसंघातून पोटनिवडणुकीत विजयी झाल्या होत्या.  

2021 च्या विधानसभा निवडणुकीत नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातून शुभेंदू अधिकारी यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा 2000 मतांनी पराभव केला होता. मतमोजणीच्या  17 फेऱ्यानंतर शुभेंदू अधिकारी विजयी झाले होते. ममता बॅनर्जींनी त्यावेळी भाजपवर निवडणुकीत गैरप्रकार केल्याचा आरोप केला होता. ममता बॅनर्जी भवानीपूर मतदारसंघातून पोटनिवडणुकीत विजयी झाल्या होत्या. यावेळी भाजपनं पुन्हा एकदा ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात शुभेंदू अधिकारी यांना उमेदवारी दिली आहे.  

भाजपनं दिलीप कुमार घोष यांना बोलपूर मतदारसंघातून, आसनसोल दक्षिणमधून अग्निमित्र पॉल, खडगपूर सदर येथून दिली घोष, माजी राज्यसभा खासदार स्वपन दास गुप्ता यांना राश बेहारी मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. भाजपनं डायमंड हार्बरमधून दीपक कुमार हलदर, आसनसोल उत्तरमधून कृष्णेंदू मुखर्जी, कालीगंजमधून बापन घोष, कूचबिहार उत्तर मधून सुकुमार रॉय, सिलिगुडीतून शंकर घोष आणि हासनमधून निखिल बॅनर्जींना उमेदवारी दिली आहे.  

भाजपचे आयटी सेलचे अध्यक्ष अमित मालवीय यांनी एक्सवर पोस्ट करत भाजपनं पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर केल्याचं म्हटलं. सुवेंदू अधिकारी हे नंदीग्राममधून लढतील, 2021 मध्ये अधिकारी यांनी ममता बॅनर्जींचा पराभव केला होता. अधिकारी आता भवानीपूरमधून देखील लढणार आहेत, जिथं ममता बॅनर्जी आमदार आहेत, एक जोरदार लढत होईल, असं मालवीय म्हणाले.

पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यात निवडणूक

निवडणूक आयोगानं रविवारी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. पश्चिम बंगाल विधानसभेच्या 294 जागांसाठी दोन टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 23 एप्रिलला मतदान होईल. तर, दुसऱ्या टप्प्यात 29 एप्रिलला मतदान होणार आहे. मतमोजणी  4 मे रोजी होणार आहे. गेल्या निवडणुकीत टीएमसीनं 215 तर भाजपनं 77 जागांवर विजय मिळवला होता.  

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
Embed widget