Health : ''माणसांचं आयुष्यच सध्या सोशल मीडियाभोवती फिरतंय! हृदय, मेंदूवर होतोय दुष्परिणाम, एका संशोधनातून समोर
Health : लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत आजकाल विविध सोशल मीडिया साइट्स वापरत आहेत. मात्र, या साइट्सचा अतिवापर आरोग्यासाठी किती हानिकारक ठरू शकते. हे तुम्हाला माहित आहे का?
Health : कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा हानिकारकच असतो...नाही का? आजकालच्या बदलत्या युगात प्रत्येकाचे आयुष्य जणू सोशल मीडियाभोवती फिरत असल्याचं दिसतंय. लोकांना या वेबसाईट्सचं इतकं व्यसन लागलंय की ते सोशल मीडियाशिवाय क्षणभरही राहू शकत नाहीत. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत आजकाल विविध सोशल मीडिया साइट्स वापरत आहेत. मात्र, या साइट्सचा अतिवापर आरोग्यासाठी किती हानिकारक ठरू शकते. हे तुम्हाला माहित आहे का? नसेल तर, एका संशोधनानुसार याबाबत काही गोष्टी समोर आल्या आहेत, त्या जाणून घ्या..
एका संशोधनानुसार अनेक गोष्टी समोर
आजकाल जवळपास प्रत्येकाकडे स्मार्टफोन असतो ज्यावर ते दिवसाचा बराचसा वेळ घालवतात, सोशल मीडिया हा आजच्या जीवनशैलीचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे, त्याशिवाय लोक त्यांचा वेळ घालवत नाहीत. 2019 मध्ये झालेल्या एका संशोधनानुसार, जे युवक दररोज किमान 3 तास सोशल मीडियावर सक्रिय असतात, त्यामुळे त्यांना नैराश्य, चिंता आणि रागाच्या समस्या जास्त आहेत. सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. अशात आज या लेखात सोशल मीडियाच्या 5 दुष्परिणामांबद्दल जाणून घेणार आहोत
लठ्ठपणा
फोन आणि सोशल मीडियाच्या व्यसनामुळे लोक बेडवरून उठत नाहीत. तर काही जण जेवतानाही रील आणि व्हिडीओ पाहत असतात. अशाप्रकारे, समोर वाढलेल्या अन्नाकडे काहीच लक्ष राहत नाही, जे नकळत खाल्ले जाते, ज्यामुळे एक निष्क्रिय जीवनशैली बनते. ज्यामुळे वजन वाढू लागते आणि व्यक्ती लठ्ठपणा, तसेच त्याच्याशी संबंधित इतर आजारांना बळी पडते.
लक्ष आणि स्पष्टता कमी होणे
सोशल मीडिया हे सर्व खऱ्या-खोट्या माहितीचे भांडार आहे. अशा स्थितीत मेंदूमध्ये अनेक प्रकारची माहिती साठून राहते, त्यातील बहुतांश माहिती निरुपयोगी असते. सोशल मीडिया पाहताना मेंदूचा एखादा कोपरा पकडते आणि त्याला निष्क्रिय बनवते, ज्यामुळे व्यक्तीचे लक्ष कमी होते. मेल्स, मेसेज, नोटिफिकेशन्स, कॉल्स, टेक्स्ट मेसेजेस या सगळ्यांमुळे एका गोष्टीचा शांतपणे विचार करण्याची क्षमता कमी होते आणि मन सतत अव्यवस्थित राहते.
ट्रेंडिंगचा घोळ
सोशल मीडिया हे उत्पन्न मिळवण्यासाठी देखील एक उत्तम साधन आहे, आजकाल यावर ट्रेंडिंगचा बोलबाला आहे. मग ते कपडे असो, खाणं असो, फॅशन असो किंवा गाणे असो. ट्रेंडिंग थीमनुसार रील किंवा व्हिडिओ बनवण्याची स्पर्धा प्रत्येकामध्ये असते. या भंपक युक्तीने तरुणांचा वर्तमान आणि भविष्य दोन्हीचा मौल्यवान वेळ वाया जातो.
झोपेचा अभाव
आजकाल, झोपण्यापूर्वी आपला फोन तपासणे ही जवळपास प्रत्येकाची सवय झाली आहे. काहीवेळा तासन् तास रील पाहताना झोपेमध्ये व्यत्यय येतो. यामुळे निद्रानाश आणि इतर झोपेचे विकार होतात.
हेही वाचा>>>
Women Health : महिलाच सहजपणे 'थायरॉईडच्या' बळी का होतात? असे का घडते? कारणं आणि सुरुवातीची लक्षणे तज्ज्ञांकडून जाणून घ्या.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )