एक्स्प्लोर

Women Health : महिलाच सहजपणे 'थायरॉईडच्या' बळी का होतात? असे का घडते? कारणं आणि सुरुवातीची लक्षणे तज्ज्ञांकडून जाणून घ्या.

Women Health : स्त्रियांना थायरॉईड होण्याची अधिक शक्यता का असते? त्याची लक्षणे काय असू शकतात? याबद्दल डॉक्टरांनी काय सांगितले? जाणून घेऊया.

Women Health : महिलांनो... इतरांची काळजी घेता घेता स्वत:च्या आरोग्याकडेही लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. चूल आणि मूल यापासून बाहेर पडत आजकाल स्त्रियाही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सर्व जबाबदाऱ्या पार पाडत आहे. परंतु महिलांनो.. एक समस्या अशी आहे, ज्याकडे तुम्ही गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. आरोग्यतज्ज्ञांच्या मते, थायरॉईड हा कोणत्याही व्यक्तीला होऊ शकतो, परंतु महिलांना याचा सर्वाधिक त्रास होतो. थायरॉईडमुळे आरोग्याशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. म्हणून, शक्य तितक्या लवकर उपचार करणे महत्वाचे आहे. महिलांना थायरॉईडशी संबंधित समस्या अधिक प्रमाणात का होतात? त्याची लक्षणे काय आहेत? जाणून घेऊया तज्ज्ञांकडून...

थायरॉईड डिसऑर्डर काय आहे?

थायरॉईड डिसऑर्डर ही एक अशी स्थिती आहे, ज्यामध्ये थायरॉईड ग्रंथी योग्यरित्या कार्य करणे थांबवते, ज्यामुळे थायरॉईड हार्मोनचे प्रमाण असंतुलित होते. थायरॉईडशी संबंधित समस्यांमध्ये दोन मुख्य समस्या आहेत, हायपोथायरॉईडीझम, ज्यामध्ये थायरॉईड ग्रंथी कमी हार्मोन्स सोडते आणि दुसरी हायपरथायरॉईडीझम आहे, ज्यामध्ये थायरॉईड ग्रंथी जास्त हार्मोन्स सोडते. तसं पाहायला गेलं तर ही समस्या कोणत्याही व्यक्तीला होऊ शकते, परंतु बहुतेक महिलांना या समस्येचा त्रास होतो. पण असे का घडते? याबद्दल माहिती मिळवण्यासाठी एका वृत्तसंस्थेने घेतलेल्या मुलाखतीनुसार स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. किंजल कोठारी यांनी याबाबत माहिती दिलीय. स्त्रियांना थायरॉईड विकार होण्याची अधिक शक्यता का असते? त्याची लक्षणे काय असू शकतात? याबद्दल त्यांनी काय सांगितले ते जाणून घेऊया.

जगभरात लाखो लोक थायरॉईडने त्रस्त

डॉक्टर म्हणाल्या की, जगभरात लाखो लोक थायरॉईडशी संबंधित समस्येने त्रस्त आहेत, मात्र महिलांना या समस्येचा जास्त त्रास होतो. थायरॉईड ग्रंथी व्यवस्थित काम करत नसल्यामुळे आरोग्याशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. म्हणूनच, स्त्रियांना या समस्येचा अधिक त्रास का होतो हे जाणून घेणे महत्वाचे आहे आणि त्याच्या लक्षणांच्या मदतीने, शक्य तितक्या लवकर शोधणे महत्वाचे आहे, जेणेकरून योग्य उपचार करण्यात मदत होईल.

महिलांना थायरॉईडच्या समस्या का जास्त असतात?

हार्मोनल बदल

महिलांच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर हार्मोन्समध्ये बदल होत असतात. पौगंडावस्थेमध्ये, गर्भधारणेदरम्यान, रजोनिवृत्तीच्या काळात आणि मासिक पाळीच्या दरम्यान देखील हार्मोन्समध्ये चढ-उतार होतात. त्यामुळे महिलांमध्ये हार्मोनल असंतुलन होण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळे या बदलांमुळे थायरॉइडच्या कार्यामध्ये बदल होऊन हायपोथायरॉईडीझम आणि हायपरथायरॉईडीझम सारख्या समस्या उद्भवू शकतात.

स्वयंप्रतिकार स्थिती

ऑटोइम्यून डिसऑर्डर ही अशी समस्या आहे, ज्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती स्वतःच्या निरोगी टिश्यूंवर हल्ला करू लागतो. हा विकार स्त्रियांमध्ये जास्त आढळतो. हाशिमोटोचा थायरॉइडायटिस आणि ग्रेव्हस् डिसीज ऑटोइम्यून हे असे विकार आहेत, जे थायरॉईड ग्रंथीवर परिणाम करतात. त्यामुळे महिलांमध्ये थायरॉईड विकाराचा धोका जास्त असतो.

अनुवांशिक कारणे

आनुवंशिक घटक देखील थायरॉईड ग्रंथीवर परिणाम करतात. त्यामुळे ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्यांना थायरॉईडची समस्या आहे त्यांच्यामध्ये धोका आपोआप वाढतो.

ताण

दीर्घकाळ तणावाचा सामना केल्याने हार्मोन्सचे असंतुलित स्तर आणि सूज देखील होऊ शकते. या कारणांमुळे थायरॉईड विकाराचा धोका वाढतो. महिलांना जास्त त्रास होऊ शकतो कारण त्यांच्याकडे खूप जबाबदाऱ्या असतात, ज्यामुळे त्या तणावामुळे होणाऱ्या समस्यांना बळी पडू शकतात.

थायरॉईड विकाराची लक्षणे कोणती?

थकवा - विश्रांती घेतल्यानंतरही सतत थकवा जाणवणे हे थायरॉईड विकाराचे लक्षण असू शकते. थायरॉईडच्या समस्येमुळे, व्यक्ती नेहमी थकल्यासारखे, सुस्त आणि कमी ऊर्जावान वाटते.

वजनात बदल - अस्पष्ट वजन वाढणे किंवा कमी होणे हे थायरॉईडशी संबंधित समस्या दर्शवू शकते. हायपोथायरॉईडीझममध्ये वजन वाढते आणि हायपरथायरॉईडीझममध्ये वजन कमी होते.

मूड स्विंग्स - थायरॉईड विकारामुळे, व्यक्तीचा मूड वारंवार बदलू लागतो. यामुळे चिडचिड, चिंता आणि नैराश्य यासारख्या समस्या उद्भवू शकतात. एखाद्या व्यक्तीच्या भावना वेगाने बदलू शकतात.

केस गळणे - केस गळणे, विशेषतः टाळूच्या बाहेरील भागातून, थायरॉईड विकाराच्या सामान्य लक्षणांपैकी एक आहे. या स्थितीत केसांच्या रचनेत बदल होणे किंवा अचानक केस गळणे हे सामान्य आहे.

अनियमित मासिक पाळी – स्त्रियांमध्ये थायरॉईड विकाराचे एक लक्षण म्हणजे अनियमित मासिक पाळी. हार्मोन्समधील बदलांमुळे, मासिक पाळीत जास्त रक्तस्त्राव होणे किंवा कमी रक्तस्राव होणे किंवा मासिक पाळी न येणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

लक्षणं दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं

थायरॉईड डिसऑर्डरची लक्षणे वेळीच ओळखणे आणि डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. थायरॉईडशी संबंधित समस्या शोधण्यासाठी डॉक्टर रक्त तपासणी आणि थायरॉईड इमेजिंगची मदत घेऊ शकतात. तसेच, त्याच्या उपचारांसाठी औषधे, जीवनशैलीत बदल आणि काही गंभीर प्रकरणांमध्ये, शस्त्रक्रिया आवश्यक आहे.

हेही वाचा>>>

Health : मंडळींनो.. सतत हॉटेलचं खाणं चांगलच पडेल महागात! आतड्यांवरील परिणाम जाणून घ्याल, तर आताच सोडाल

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6PM 14 January 2025Walmik Karad Supporters: कराडवर लोकांचं प्रेम, परळी थांबलीय, कार्यकर्त्याने अंगावर पेट्रोल ओतलंAjit Pawar On Walmik Karad | दोषींवर योग्य ती कारवाई केली जाणार, मुंडेंबाबत प्रश्न अजितदादा म्हणाले...ABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 5PM 14 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! राज्यातील शाळांसाठी CBSE पॅटर्न; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, शिक्षणमंत्र्यांची माहिती
मोठी बातमी! राज्यातील शाळांसाठी CBSE पॅटर्न; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, शिक्षणमंत्र्यांची माहिती
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
मोठी बातमी! ST कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचे रुग्णालय; परिवहन मंत्र्यांची घोषणा
मोठी बातमी! ST कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचे रुग्णालय; परिवहन मंत्र्यांची घोषणा
Walmik Karad MCOCA : लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
Embed widget