Health: मोमोज लव्हर्स लक्ष द्या..'अशा' प्रकारे बनवलेले मोमोज खाल, तर वजन वाढणार नाही! 'या' 5 टिप्स, अनेकांना माहीत नाही..
Health: वजन कमी कराचय तर अनेकदा जंक फूड आणि रिफाइंड पिठापासून बनवलेले पदार्थ टाळण्याचा सल्ला दिला जातो. आज आम्ही तुम्हाला हेल्दी मोमोज बनवण्याची योग्य पद्धत सांगत आहोत.
Health: गरमागरम मोमोज... त्यासोबत मेयोनिज आणि चटणी.. असे अनेक खवय्ये आहेत, ज्यांचा मोमोज म्हटला की अत्यंत आवडता पदार्थ आहे. कोणाला वाफवलेले आवडतात, तर कोणाला तळलेले.. विशेषत: दिल्ली आणि उत्तर भारतात, हा एक लोकप्रिय नाश्ता आहे. काही लोक रोज एक प्लेट मोमोज खातात, जे आपल्या आरोग्यासाठी अजिबात चांगले नाही. मोमोज पिठापासून बनवले जातात आणि त्यात हानिकारक मसाले असतात. हे खाल्ल्याने वजन वाढते. अशा परिस्थितीत आहार तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, ज्या लोकांना वजन कमी करायचे आहे, त्यांनी मोमोज खाणे टाळावे. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल आणि मोमोजही खायचे असतील, तर या पद्धतीने मोमोज तयार करून खा. ज्याला गिल्ट फ्री मोमोज असेही म्हणतात.
हेल्दी गिल्ट फ्री मोमोज कसे बनवायचे?
गव्हाचे पीठ - बाजारात उपलब्ध असलेले मोमो हे मैद्याच्या पिठापासून बनवले जातात. वजन नियंत्रित करण्यासाठी घरीच मोमोज बनवा आणि मैद्याऐवजी गव्हाचे पाठ वापरा. गव्हाच्या पीठात फायबर आणि आवश्यक पोषक तत्व असल्याने हे आरोग्यदायी नाश्ता बनवते. गव्हाच्या पिठात थोडी नाचणी पावडर टाकून तुम्ही ते आणखी पौष्टिक बनवू शकता.
प्रोटीन स्टफिंग - प्रोटीन स्टफिंग म्हणजे मोमोजमध्ये भरण्यासाठी भाजी, चिकन किंवा चीज टाकण्यात कंजूसपणा करू नका. तुम्ही भाज्या आणि चीज मिक्स करू शकता किंवा भाज्यांसोबत चिकन एकत्र करून फिलिंग बनवू शकता. हे मोमोजला चवदार आणि पौष्टिक बनवतात.
स्वयंपाक करण्याची पद्धत - हेल्दी मोमोज खाण्यासाठी, ते तेलात तळण्याऐवजी वाफेवर शिजवा. वाफवलेले मोमो हे तेलमुक्त आणि कॅलरी कमी असतात. वाफावण्याच्या प्रक्रियेद्वारे शिजवल्यावर, मोमोजमध्ये असलेल्या फिलिंगचे पोषण तसेच राहते. अशा प्रकारे हे मोमो निरोगी होतात.
मोमोसह चटणी - लाल मिरची सॉस बनवण्यासाठी विविध रसायने आणि हानिकारक मसाले देखील वापरले जातात. मेयोनेझमध्ये रिफाइंड तेल देखील भरपूर असते. मोमोसोबत खाण्यासाठी तुम्ही कोथिंबीर चटणी, टोमॅटो-लसूण चटणी आणि घरी मेयोनिझ बनवू शकता.
खाण्याची योग्य पद्धत - जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर अशा पदार्थांचे सेवन शक्य तितके कमी करावे. तुम्ही हे गिल्ट फ्री मोमोज खाऊ शकता, पण ते कमी प्रमाणात खाणे चांगले. जास्त खाल्ल्याने शरीरावर तसेच वजनावर विपरीत परिणाम होतो.
हेही वाचा>>>
Health: मोठ्यातले मोठे आजार राहतील दूर! स्वामी रामदेवांचा 'सीक्रेट डाएट प्लॅन! अनेकांना माहीत नाही, जीवनात घडवून आणतील मोठे बदल
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )