Health: काय प्रकार! Love Bites मुळे होऊ शकतो मृत्यू? जास्त दबावाने ब्रेन स्ट्रोकचा धोका? आरोग्य तज्ज्ञ म्हणतात...
Health: लव्ह बाइट्स हा तुमच्या जोडीदारावर प्रेम व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे. पण हाच लव्ह बाईट एखाद्यासाठी जीवघेणा ठरू शकतो का? डॉक्टर सांगतात...
Health: प्रेम म्हणजे प्रेम असतं... तुमचं आमचं सर्वांचं सेम असतं.. प्रेमावरील या ओळी आपल्या सर्वांनाच माहित आहे. प्रेम म्हणजे दोन जीवांचं मनोमिलन, प्रेम म्हणजे एकमेकांचा सुंदर सहवास.. पण हाच सहवास कधी कोणासाठी मृत्यूचं कारण बनू शकतो, याचा कधी तुम्ही विचार केला आहे का? अशीच एक घटना घडली, लव्ह बाइट्स हा तुमच्या जोडीदारावर प्रेम व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे. पण हाच लव्ह बाईट किंवा हिकी एखाद्याचा जीव घेऊ शकतो का? सोशल मीडियावर लोक या विषयावर अनेकदा कमेंट करतात. त्याच वेळी, याविषयीची पहिली चर्चा 2023 मध्ये सुरू झाली, जेव्हा मेक्सिकोमध्ये एका 17 वर्षीय मुलाचा त्याच्या प्रेयसीच्या लव्ह बाईटमुळे स्ट्रोक आल्याने मृत्यू झाला.
लव्ह बाइट्स कधी प्राणघातक होऊ शकतो?
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, लव्ह बाइट्स किंवा हिकीमुळे कोणालाही धोका नाही. पण प्रेमात वाहून जाऊन लव्ह बाईट घेताना मानेवर दाब किंवा जास्त जोर दिल्यास ते जीवघेणे ठरू शकते. खरं तर, जास्त दाबामुळे, मानेच्या माध्यमातून आपल्या मेंदू आणि हृदयाशी जोडलेल्या नसांना इजा होण्याचा धोका असतो. असे डॉक्टर म्हणतात.
ब्रेन स्ट्रोकचाही धोका होऊ शकतो?
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, लव्ह बाईटमुळे जेव्हा कोणी जास्त दाब देऊन मानेच्या रक्तवाहिनीला इजा पोहचते, तेव्हा मानेच्या नसाचा पातळ थर कमकुवत होतो आणि आतून रक्तस्त्राव सुरू होतो. वैद्यकीय भाषेत याला Dissection म्हणतात, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. म्हणजेच, मानेच्या आत रक्ताची गुठळी तयार होते आणि जेव्हा ती मेंदूमध्ये जाते तेव्हा त्या व्यक्तीली स्ट्रोक येतो. डॉक्टर म्हणतात की, हे केवळ दुर्मिळ प्रकरणांमध्येच होते. साधारणपणे लव्ह बाईटमुळे कोणाच्याही जीवाला धोका नसतो.
हेही वाचा>>>
Women Health: पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये हिमोग्लोबीनची कमतरता अधिक? अशक्तपणाही अधिक? कारणं आणि उपाय जाणून घ्या
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )