Health: मधुमेहींनो सावधान! रक्तात वाढलेली साखर हिरावून घेते दृष्टी? या गंभीर आजाराचा धोका? जाणून घ्या...
Health: मधुमेह हा जीवनशैलीशी संबंधित गंभीर आजार आहे. जेव्हा शरीरातील साखरेची पातळी सामान्यपेक्षा जास्त होते, तेव्हा त्याचा परिणाम शरीराच्या इतर भागांवरही होऊ लागतो. जाणून घ्या..
Health: मधुमेह याला इंग्रजीत डायबिटीज असेही म्हणतात. मधुमेहाचे नाव काढताच अनेकांना घाम फुटतो. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, हा आजार आपल्या वाईट जीवनशैलीच्या परिणामामुळे होतो. भारत ही मधुमेहाची राजधानी मानली जाते. मधुमेहाचे सर्वाधिक रुग्ण येथे राहतात. टाइप-2 मधुमेह हा रक्तातील साखरेचा गंभीर प्रकार आहे. या प्रकारात, ही साखर सामान्य प्रमाणापेक्षा जास्त होते, ज्यामुळे शरीराच्या इतर भागांवर परिणाम होऊ लागतो. त्यामुळे अनेकांना गंभीर आजाराचा सामना करावा लागत आहे. विशेषत: डोळ्यांवर अधिक परिणाम जाणवतो, ज्यामुळे दृष्टी हिरावून घेण्याची शक्यता असते, जाणून घ्या सविस्तर या आजाराबद्दल...
धूम्रपान आणि मद्यपान करणाऱ्या लोकांवरही याचा परिणाम
डायबेटिक रेटिनोपॅथी हा दृष्टीशी संबंधित आजार आहे, जो मधुमेही रुग्णांमध्ये होतो. विशेषतः टाईप-2 च्या रुग्णांना याचा जास्त फटका बसतो. शुगर असूनही धुम्रपान आणि मद्यपान करणाऱ्या लोकांवरही याचा परिणाम होतो. साखरेचे प्रमाण वाढल्याने डायबेटिक रेटिनोपॅथी नावाच्या डोळ्यांच्या आजाराचा धोका वाढतो. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, हा आजार असलेल्या लोकांना दिसण्यातही त्रास होऊ शकतो. या रोगाचे कारण आणि प्रतिबंधात्मक उपायांसह त्याची प्रारंभिक चिन्हे जाणून घेऊया.
डायबेटिक रेटिनोपॅथी धोकादायक का आहे?
डायबेटिक रेटिनोपॅथीमुळे रेटिनाला (डोळ्याचा आतील थर) रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांचे जास्त प्रमाणातील साखरेमुळे नुकसान होते. कालांतराने, हा रोग डोळ्यांच्या दृष्टीवर परिणाम करू शकतो आणि वेळेत उपचार न केल्यास अंधत्व येऊ शकते.
डायबेटिक रेटिनोपॅथीची सुरुवातीची लक्षणे
- अंधुक डोळे.
- कमी दिसणे
- सतत डोकेदुखी.
- चक्कर येणे
- डोळ्यासमोर काळे डाग किंवा काहीतरी तरंगताना दिसणे.
डायबेटिक रेटिनोपॅथी टाळण्यासाठी उपाय
- दर 6 महिन्यांनी डोळे तपासा.
- मधुमेह तपासत राहा जेणेकरून साखरेची पातळी नियंत्रित राहील.
- रक्तदाब वाढू देऊ नका.
- वजन कमी करा.
- जर तुम्ही साखरेचे औषध घेत असाल तर ते वेळेवर आणि सूचनांनुसार घ्या.
मधुमेह नियंत्रित करण्याचे काही उपाय
- निरोगी आणि फायबर युक्त आहार घ्या.
- ताजी फळे आणि भाज्या खा.
- पुरेशा प्रमाणात पाणी प्या.
- रोज व्यायाम करा.
- साखरेऐवजी इतर गोड पदार्थ वापरा.
हेही वाचा>>>
Health: बिअर पिणाऱ्यांनो सावधान! वाईन पिणारे बिअर पिणाऱ्यांपेक्षा अधिक सक्रिय असतात? संशोधनात म्हटलंय...
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )