Health: बिअर पिणाऱ्यांनो सावधान! वाईन पिणारे बिअर पिणाऱ्यांपेक्षा अधिक सक्रिय असतात? संशोधनात म्हटलंय...
Health: एक नवीन संशोधनात समोर आले आहे की, बिअर पिणाऱ्यांचे डाएट कमी असते, ते कमी सक्रिय असतात, तर वाइन आणि अल्कोहोल पिणाऱ्यांपेक्षा ते जास्त धूम्रपान करतात.
Health: तसं पाहायला गेलं तर मद्यपान करणं आरोग्यासाठी हानिकारक आहे, मात्र जगभरात असे अनेक लोक आहेत ज्यांना बिअर (Beer) किंवा वाईन (Wine) पिणे आवडते. अनेकदा लोक विशेष प्रसंगी किंवा विशेष दिवस साजरा करण्यासाठी त्यांचे सेवन करतात. एका संशोधनात असे दिसून आले आहे की, तुम्ही ज्या प्रकारचे मद्यपान करतात त्याचा तुमच्या जीवनशैलीवर परिणाम होतो. असे आढळून आले आहे की, मद्य किंवा वाइन पिणाऱ्यांच्या तुलनेत बिअर पिणाऱ्यांची जीवनशैली वाईट, त्यांचे डाएट चांगले नसते. या संशोधनाबद्दल जाणून घेऊया.
दारू पिणे ही चांगली सवय नाही..
आपल्या सर्वांना माहित आहे की, दारू पिणे ही चांगली सवय नाही किंवा ती आपल्या आरोग्यासाठी चांगली मानली जात नाही. गरजेपेक्षा जास्त दारू प्यायल्यास नशासोबतच उलट्या, चक्कर येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, हृदयाचे ठोके कमी होणे आदी समस्या उद्भवतात. याशिवाय यकृताशी संबंधित आजार, पचनाच्या समस्या, हृदयाशी संबंधित समस्या, मधुमेह यांसारखे आजार होऊ शकतात. वेगवेगळ्या मद्यांमध्ये आढळणारे स्पिरिट वेगळे असतात. एका नवीन संशोधनातून असे दिसून आले आहे की काही स्पिरिट इतरांपेक्षा कमी हानिकारक असतात.
बिअर पिणाऱ्यांनी सावध राहा
अमेरिकन असोसिएशन फॉर द स्टडी ऑफ लिव्हर डिसीजने एक नवीन संशोधन केले आहे, ज्यामध्ये असे दिसून आले आहे की बिअर पिणाऱ्यांचा डाएटचा दर्जा कमी असतो, ते कमी सक्रिय असतात आणि वाइन आणि अल्कोहोल पिणाऱ्यांपेक्षा जास्त धूम्रपान करतात. हे संशोधन 1,900 हून अधिक अमेरिकन अल्कोहोल पिणाऱ्यांवर केले गेले, त्यापैकी 38.9% लोकांनी फक्त बिअरचे सेवन केले, तर 21.8% लोकांनी फक्त वाइन प्यायली, 18.2% ने फक्त मद्य प्याले आणि 21% ने वेगवेगळ्या प्रकारचे मद्यपान केले. संशोधक नोवाक म्हणाले की, अल्कोहोल सेवन करणाऱ्या कोणत्याही गटाने 80-पॉइंट स्कोअर मिळवला नाही, जो 100-पॉइंट हेल्दी इटिंग इंडेक्सवर चांगल्या आहारासाठी मानक मानला जातो. याउलट बिअर पिणाऱ्यांची परिस्थिती वाईट होती, त्यांनी सर्वात कमी म्हणजे फक्त 49 गुण मिळवले. तर वाइन पिणाऱ्यांनी 55 गुण मिळवले. तर, मागील संशोधनात असे आढळून आले की, कोणत्याही प्रकारच्या अल्कोहोलचे सेवन वाढल्याने आहाराची गुणवत्ता घसरते.
बिअरच्या अतिसेवनामुळे 'हे' गंभीर आजार
संशोधनात असे दिसून आले आहे की मद्यपान करणाऱ्यांमध्ये आहाराच्या गुणवत्तेत फरक आहे. कारण लोक अन्न आणि अल्कोहोल एकत्र घेतात. यूएसएमध्ये, फायबरचे प्रमाण कमी आणि कार्बोहायड्रेट आणि प्रक्रिया केलेले मांस जास्त असलेल्या अन्नपदार्थांसह बिअरचे सेवन केले जाते. नोवाकच्या मते, तळलेले किंवा खारट पदार्थ तहान वाढवतात, ज्यामुळे फक्त बिअर पिण्याची सवय लागू शकते. दुसरीकडे, वाइन - विशेषत: रेड वाईन - बहुतेकदा मांस, भाज्या आणि दुग्धजन्य पदार्थ असलेले जेवण दिले जाते. बिअरच्या अतिसेवनामुळे उच्च रक्तदाब, हृदयाच्या समस्या, आहाराशी संबंधित समस्या, तोंडाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग आणि इतर समस्या उद्भवू शकतात.
हेही वाचा>>>
Health: दारूच्या सेवनानंतर लोकांना 'नशा' कशी आणि का चढते? मेंदूवर कसा परिणाम होतो? भान का हरवते? आरोग्य तज्ज्ञ सांगतात...
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )