Pallavi Saple on HMPV : पुण्यातील 13 टक्के मुलांना HMPVचा संसर्ग 2022-23 सालीच झाला होता
Pallavi Saple on HMPV : पुण्यातील 13 टक्के मुलांना HMPVचा संसर्ग 2022-23 सालीच झाला होता
HMPV वायरस 2002-03 पासून भारतात, 2022-23 मध्ये पुण्यातील 13 टक्के लहान मुलांना HMPV व्हायरसचा संसर्ग झाल्याचे रिसर्च मधून समोर
HMPV वायरस चीन मधून आलेला नाही, मागील अनेक वर्षांपासून देशात, HMPV व्हायरसला घाबरण्याची अजिबात गरज नाही
HMPV व्हायरस हा मुळात चायना मधून आलेला नाही
कोरोना व्हायरस हा नवीन वायरस होता त्याच्यामुळे त्याला नोव्हेल कोरोना व्हायरस असं म्हटलं होतं
HMPV वायरस हे मागील 50 -60 वर्षापासून जगभरात आहे, आपल्या देशात 2004 मध्ये पुण्यात.. 2011 मध्ये एम्स मधून स्टडी पब्लिश झाली आहे
गेल्या वर्षीच पुण्याच्या केईएम रुग्णालयाचा पब्लिश रिपोर्ट आहे ज्यामध्ये 13% मुलांना एचएमटीव्ही वायरस झाला आहे
हा व्हायरस जगात देशात सगळीकडे आहे, मूल पाच वर्षाचा होईपर्यंत सगळ्याला याचा संपर्क येऊन गेलेला असतो... रोगप्रतिकारक शक्ती त्याला आलेली असते
सर्दी खोकला हा संसर्गजन्य रोग आहेच, पण हा रोग काही चायनातून आलेला नाहीये... आणि यामध्ये मृत्यूचे प्रमाण फार कमी आहे... ज्यांची रोगप्रतिकारक क्षमता कमी आहे त्यांनाच तो होतो
हा आजार मोठ्यांना सुद्धा होऊ शकतो मात्र जास्त केसेस या लहान मुलांमध्ये आढळतात...
हा जर सगळ्यांना होऊ शकतो पण कॉम्प्लिकेशन्स फक्त ज्याची रोगप्रतिकारक क्षमता कमी आहे त्यांना होतील
कोरोना आणि एचएमपीव्ही मध्ये फरक नेमका काय?
कोरोना मध्ये कॉम्प्लिकेशन्स अधिक होती, रुग्णांचे व्हेंटिलेटर वर जाण्याचे प्रमाण जास्त होतं... कोणाच्या विविध लाटा यायच्या म्हणजेच म्युटेड तो व्हायचा... कोरोनाचे लॉन्ग टर्म साईड इफेक्ट सुद्धा खूप होते
एचएमपीव्ही हा संसर्गजन्य कमी आहे... सर्दी ताप खोकला हीच त्याची लक्षण आहेत... त्यांना खूप जास्त त्रास होतो त्यांनी डॉक्टर कडे जावं... पण उपचार घेण्याचे प्रमाण याचं कमी आहे... एचएमटीव्ही चा संसर्ग झाला तर घरीच थांबावं... सर्दी ताप खोकल्याचा उपचार करावा
२००२-२००३ पासून HMPV व्हायरस भारतात रिसर्च मधून समोर, घाबरण्याचं कुठलंही कारण नाही
नेमकी खबरदारी काय घ्यायची आहे ?
शिंकताना खोकताना तोंड झाकाव, जमेल तेव्हा हात धुवावे.. कोरोनासाठी जे केलं तेच करायचं पण मास्क वगैरे ची गरज नाही... मास्क फक्त त्यांनीच घालाव ज्यांना लक्षण आहेत. किंवा ज्यांची प्रतिकारक्षमता कमी आहे त्यांनी मास्क घालावं..
महाराष्ट्रात एचएमपीव्हीच्या केसेस वाढल्या तर?
तपासण्या वाढवल्या की केसेस वाढतील, केसेस वाढल्या तरी घाबरण्याचा कारण नाही... केसेस तेवढ्याच असतील जेवढ्या मागच्या वर्षी होत्या...
एचएमपीव्ही च्या अनुषंगाने काही विशेष खबरदारी रुग्णालयात घेण्यात येते का?
सध्या काही स्पेशल प्रिकॉशन्स घेतले गेले नाही स्पेशल वॉर्डची सध्या गरज नाही... आकडा आम्ही मॉनिटर करत आहोत... जर वायरस बदलला तर किंवा तशा प्रकारचे निर्देश आले तर त्यानुसार आम्ही प्रिकॉशन्स घेऊ
हा मागील वर्षी पुण्याचा KEM रुग्णालयाचा रिपोर्ट ज्यामध्ये 13% एक वर्षापेक्षा कमी असलेल्या... आणि आठ टक्के एक ते आठ वर्षाच्या लहान मुलांना HMPV वायरस चा संसर्ग झाल्याचे समोर आलेला आहे