Health: सलग 12 महिने गव्हाच्या पीठाची पोळी खाणं ही भारतीय प्रथा नाही? आयुर्वेदीक डॉक्टरांकडून जाणून घ्या 5 तोटे
Health: आयुर्वेदीक डॉक्टर म्हणतात, 12 महिने गहू खाण्याची प्रथा भारतीय नाही. आपल्या देशात ऋतू आणि महिन्यानुसार वेगवेगळी धान्ये खाल्ली जात असे.
Health: आपल्या भारतीय जेवणात वरण-भात, पोळी-भाजी असे अन्नपदार्थ खाल्ले जातात. त्यात गव्हाच्या पीठाची पोळी हे एक सामान्य अन्नपदार्थ आहे. हे जवळजवळ प्रत्येक भारतीय घरांमध्ये पोळी दररोज बनवली जाते. अनेक लोक गव्हाच्या पिठापासून बनवलेली पोळी खातात, कारण गहू फायदेशीर मानला जातो, परंतु आयुर्वेदीक डॉक्टर हे आचार्य मनीष यांचे या विषयावर वेगळे मत आहे. असे करण्यास का नकार देतात? जाणून घ्या..
गव्हाची पोळी आरोग्यदायी आहे की नाही? अद्यापही मतभेद
गव्हाचे पीठ हा भारतीय आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि बहुतेक लोक ते रोज खातात. गव्हाचे पीठ आरोग्यासाठी पोषक असले तरी, वर्षभर सतत, याचे सेवन केल्यास त्याचे काही गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात. गव्हाच्या पिठाची पोळी हे आपल्यासाठी मुख्य अन्न असू शकते, परंतु आरोग्य तज्ज्ञांमध्ये यावर अजूनही मतभेद आहेत. गहू आरोग्यदायी आहे, परंतु मधुमेह आणि ग्लूटेनचे सेवन वाढवू शकते, जे शरीरासाठी खूप नुकसानदायक आहे. आचार्य मनीष यांचाही असाच काहीसा विश्वास आहे. रिपोर्टमध्ये जाणून घेऊया, गव्हाच्या पिठाची पोळी खाण्याचे काय तोटे आहेत आणि त्यासाठी चांगले पर्याय कोणते असू शकतात?
आचार्य मनीष काय म्हणतात?
आचार्य मनीष, एक आयुर्वेदिक डॉक्टर आहेत, जे लोकांना सात्विक जीवन जगण्याचे फायदे आणि मार्ग सांगतात. ॲलोपॅथीपासून दूर राहून आयुर्वेदाचा अवलंब करतात. अलीकडेच, आचार्य मनीष यांनी ताज्या पॉडकास्ट शोमध्ये सांगितले आहे की, गव्हाच्या पिठाची पोळी वर्षभर खाऊ नये. 12 महिने गहू खाण्याची प्रथा भारतीय नाही. आपल्या देशात ऋतू आणि महिन्यानुसार वेगवेगळी धान्ये खाल्ली जात असे, जसे की हिवाळ्यात मका आणि बाजरी खाल्ली जात असे. गहू काही महिने खाल्ले, नंतर इतर धान्यांचा वापर कमी झाला.
View this post on Instagram
गव्हाच्या पिठाची पोळी खाण्याचे तोटे
पचन समस्या
गव्हात ग्लूटेन असते, जे काही लोकांना पचणे कठीण असते. जर तुम्ही ग्लूटेन इनटॉलरेंस किंवा सेलिआक रोगाने ग्रस्त असाल तर गव्हाचे पीठ तुमच्यासाठी हानिकारक असू शकते. तुम्ही लोक गव्हाच्या पीठाची पोळी जास्त दिवस खात असाल तर पोट फुगणे, गॅस, अपचन यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
मधुमेह
गव्हाच्या पिठाचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्त आहे, याचा अर्थ ते शरीरातील रक्तातील साखर वेगाने वाढवू शकते. जर तुम्ही या पिठापासून बनवलेल्या पोळीचे रोज सेवन केले तर तुम्हाला टाइप 2 मधुमेहाचा धोका वाढू शकतो.
वजन वाढणे
गव्हाच्या पिठात कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण चांगले असते, जे शरीरात ऊर्जा म्हणून साठवले जाऊ शकते. गव्हाच्या पिठाचे सतत सेवन केल्याने शरीरातील कॅलरीजचे प्रमाणही वाढते, ज्यामुळे शरीरात चरबी जमा होते. तुम्ही तुमच्या शारीरिक हालचाली कमी केल्यास वजन वाढण्याची शक्यता असते.
हृदयरोग
12 महिने सतत गव्हाचे पीठ खाल्ल्याने कोलेस्टेरॉल आणि ब्लड प्रेशरच्या पातळीवर परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे दीर्घकाळात हृदयविकाराचा धोकाही वाढू शकतो. गव्हाच्या पिठात फायटिक ऍसिड नावाचे तत्व असते, जे आपल्या आरोग्यासाठी फारसे फायदेशीर नसते. त्याच्यामुे खनिजांच्या शोषणावर परिणाम करते. ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकची प्रकरणे वाढवते.
कुपोषण
तुम्ही कधी विचार केला आहे की गव्हाच्या पिठात पोषक तत्वे असूनही ते मानवांना कुपोषणाचे बळी बनवू शकते? हे देखील सत्य आहे की जर आपण पूर्णपणे गव्हाच्या सेवनावर अवलंबून राहिलो आणि इतर धान्यांपासून दूर राहिलो तर शरीरात जीवनसत्त्वे, खनिजे आणि प्रथिने यांची कमतरता निर्माण होऊ शकते. यामुळे विशेषतः लहान मुले आणि वृद्धांमध्ये वाढ आणि हाडांशी संबंधित समस्या देखील वाढू शकतात, .
गव्हाच्या पिठासाठी सर्वोत्तम पर्याय
- बेसन पासून बनवलेली पोळी तुम्ही खाऊ शकता.
- हिवाळ्यात मक्याच्या पीठाच्या पोळ्या खाऊ शकतात.
- बाजरीचे पीठ देखील फायदेशीर आहे.
- नाचणीच्या पिठाची पोळी तुम्ही खाऊ शकता.
- बाजरीच्या पीठाची पोळी हा उत्तम पर्याय असू शकतो.
हेही वाचा>>>
Women Health: जुळं... तिळं... एखाद्या स्त्रीला एका वेळी एकापेक्षा जास्त मुलं कशी होतात? कारण जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )