Health Care Tips : उत्तम तब्येतीसाठी तूप खाणं ठरतं फायदेशीर, जाणून घ्या फायदे
Health Care Tips : रोजच्या जेवणात अनेक खाद्यपदार्थांमध्ये तूप वापरले जाते. तूपामधील अनेक पोषक घटक शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.
Health Care Tips : दररोज जेवणात अनेक खाद्यपदार्थांमध्ये तूप वापरले जाते. तूपामधील अनेक पोषक घटक शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. आयुर्वेदातही याला औषध मानले जाते. प्राचीन काळापासून शरीरातील रोगांची लक्षणे नष्ट करण्यासाठी सात्विक आहारात तुपाचा वापर केला जातो. देशी तूपामुळे अन्नाला चव येते.
काहीजणांना वाटतं तूप खाल्ल्यानं वजन वाढतं. म्हणून ते तूप खाणं टाळतात. गावठी तूप देखील दोन प्रकारचं आहे. एक पिवळं तूप आणि दुसरे पांढरं तूप. पांढरं तूप म्हशीच्या दुधापासून तर पिवळे तूप गाईच्या दुधापासून बनवले जाते. देशी तूप हे प्रथिने, निरोगी चरबी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन के यांचा उत्कृष्ट स्रोत आहे. देशी तूप तुमची त्वचा, केस, पचन आणि हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम आहे. तर पिवळ्या तुपाच्या तुलनेत पांढऱ्या तुपात फॅटचे प्रमाण जास्त असते.
गाईच्या तुपापेक्षा म्हशीच्या तुपामध्ये जास्त फॅट आणि कॅलरीज असतात. त्यामुळे सर्दी, खोकला आणि कफ आणि सांधेदुखीवर नियंत्रण राहण्यास मदत होते. गाईचे तूप म्हणजेच पिवळे तूप वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. याचा उपयोग प्रौढांपासून मुलांपर्यंत लठ्ठपणा कमी करण्यासाठी केला जातो. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ते पचायला सोपे आहे. गाईच्या दुधात A2 प्रोटीन असते, जे म्हशीच्या दुधात नसते. A2 प्रोटीन फक्त गाईच्या तुपात आढळते.
खरं पाहता दोन्ही प्रकारचे तूप मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी फायदेशीर आहे. हे पचायला खूप सोपे आहे. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार तुम्ही आपल्याला हवं ते तूप वापरू शकता.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
संबंधित बातम्या
Bike Tips: हिवाळ्यात मोटारसायकलीवरुन ट्रिपला जाताय....नेमकी काय काळजी घ्याल?
Skin Care Tips: हिवाळ्यात कोरफड त्वचेसाठी वरदान; असे तयार करा फेस पॅक
Winter Hair Care Tips: थंडीत उद्भवतेय ड्राय हेअर्सची समस्या? 'हे' हेअर मास्क करतील दूर
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )