Bike Tips: हिवाळ्यात मोटारसायकलीवरुन ट्रिपला जाताय....नेमकी काय काळजी घ्याल?
थंडीमध्ये अनेकजण डोंगरावर ट्रेक करायला जातात. जर तुम्ही हिवाळ्यात डोंगरावर बाईक राईड करण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. नेमकी काय काळजी घ्याल?
Tips For Bike Trip : सध्या जोराची थंडी सुरू आहे. या थंडीच्या मोसमात आणि नाताळच्या सुट्ट्याजवळ आल्या की सगळ्यांनाच फिरायला जाण्याचे वेध लागतात. या थंडीमध्ये अनेकजण डोंगरावर ट्रेक करायला जातात. जर तुम्ही हिवाळ्यात डोंगरावर बाईक राईड करण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. हिवाळ्यात मोटारसायकलवरून हिल स्टेशनवर जाणे हे अवघड काम असते. पण अनेकजण ते धाडस करतात. या दिवसात मोटारसायकलने डोंगरावर जाणाऱ्यांनी अनेक गोष्टींची चांगली काळजी घेतली पाहिजे.
जवळ उबदार कपडे ठेवा
जेव्हा तुम्ही मोटारसायकल घेऊन डोंगराकडे जाता, त्याआधी तुम्ही स्वत:जवळ उबदार कपडे ठेवा.
शक्य असल्यास, काही अतिरिक्त उबदार कपडे देखील जवळ ठेवा. कारण, सपाट भागांपेक्षा पर्वतांमध्ये जास्त थंडी वाजत असते. अशा परिस्थितीत, आपल्याला अतिरिक्त उबदार कपड्यांची आवश्यकता भासू शकते. अशा थंडीच जर तुमच्याजवळ लेदर जॅकेट असेल तर अधिक चांगले. कारण, लेदर जॅकेट मोटारसायकलवरील थंडीपासून तुमचे रक्षण करते.
मोटारसायकलची सर्व्हिसिंग करा
तुम्ही सहलीला जाण्यापूर्वी आपल्या मोटारसायकलची सर्व्हिसींग करून घ्या. कारण, डोंगराळ रस्त्यावर अचानक मोटारसायकल बंद पडते. अशा वेळी बऱ्याचदा डोंगराळ भागात तुम्हाला मेकॅनिक मिळत नाही. अशा स्थितीत मोटारसायकलला काही अडचण आली, तर तुम्हाला फसल्यासारखे वाटते. त्यामुळे सहलीला निघण्यापूर्वी मोटारसायकलची सर्व्हिस करा, त्यामुळे तुम्हाला डोंगराळ भागातील रस्त्यांवर काही अडचण येणार नाही.
हवामानाची स्थिती
तुम्ही कुठेही सहलीला जाताना एका गोष्टीची अवश्य माहिती घ्या. ती म्हणजे ज्या ठिकाणी जाणार आहात, त्याठिकाणच्या हवामानाची माहिती आधीच मिळवा. त्यामुळे तुम्हाला तेथील परिस्थिती नेमकी कशी आहे हे समजते. भारतीय हवामान विभागाच्या वेबसाइटवरून तुम्हाला सध्याच्या हवामानाची पूर्ण माहिती मिळू शकते. यामुळे तुम्ही भेट देत असलेल्या भागात हवामान कसे आहे याबरोबच तुम्हाला कोणत्या वस्तूंची गरज आहे याची कल्पना देखील येईल, त्यामुळे तुम्हाला सहलीला जाण्यापूर्वी योग्य प्रकारे नियोजन करता येईल.
बर्फ पडत असेल तर....
समजा तुम्ही ज्या भागात सहलीसाठी जात आहात, तिथे जर बर्फवृष्टी होत असेल तर तुम्हाला विशेष काळजी घेण गरजेचं आहे. बर्फाळ भागात जाण्यापूर्वी तुम्हाला पूर्ण तयारी करावी लागेल. समजा त्या भागात पाऊस पडत असेल तर त्यासाठीही तुम्हाला तयार राहावे लागेल. हवामान खात्याच्या वेबसाईटवर असलेल्या अपडेट्सवरून तुम्हाला या सर्व गोष्टींची कल्पना येऊ शकते. त्यानुसार तुम्ही सहलीचे नियोजन आणि काळजी घेऊ शकता.
महत्त्वाच्या बातम्या :
- Bail Gada Sharyat : बैलगाडी शर्यतीस परवानगी देण्याबाबत राज्य सरकारची नियमावली - वाचा मुद्देसुद आणि सविस्तर
- ST Workers Strike : सरकार हातावर हात ठेवून गप्प बसणार नाही', आम्ही जनतेलाही बांधील; अनिल परब यांचा संपकऱ्यांना इशारा