Winter Hair Care Tips: थंडीत उद्भवतेय ड्राय हेअर्सची समस्या? 'हे' हेअर मास्क करतील दूर
हिवाळ्यामध्ये त्वचेची आणि केसांची (Skin and Hair Care) विशेष काळजी घेतली पाहिजे.
![Winter Hair Care Tips: थंडीत उद्भवतेय ड्राय हेअर्सची समस्या? 'हे' हेअर मास्क करतील दूर winter hair care tips for hair dryness greek yogurt honey hair mask Winter Hair Care Tips: थंडीत उद्भवतेय ड्राय हेअर्सची समस्या? 'हे' हेअर मास्क करतील दूर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/21/574c57944536e814bbe6d1d0f7f3f103_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Winter Hair Care Tips for Hair Dryness: हिवाळ्यामध्ये त्वचेची आणि केसांची (Skin and Hair Care) विशेष काळजी घेतली पाहिजे. थंडीत हवेमुळे केस कोरडे होतात. प्रदुषण आणि केसांची निगा न राखणे या कारणांमुळे केस गळतीला सामोरे जावे लागते. केमिकल बेस्ड प्रोडक्टचा वापर केल्याने (Chemical Based Products) केस डॅमेज होऊ शकतात. जर तुम्हाला थंडीमध्ये सिल्की केस हवे असतील तर हा हेअर मास्क नक्की वापरा -
ग्रीक योगर्ट आणि मधाचा हेअर मास्क
साहित्य
ग्रीक योगर्ट- 4 चमचे
मध-1 चमचा
लिंबाचा रस- 1 चमचा
ग्रीक योगर्ट आणि मधाचा हेअर मास्क तयार करण्यासाठी एका वाटीमध्ये 4 चमचे ग्रीक योगर्ट घ्या. त्यामध्ये लिंबाचा रस आणि मध मिक्स करा. तयार झालेली ही पेस्ट डोक्याला लावा. एक तास झाल्यानंतर कोमट पाण्याने धुवा. आठवड्यामधून एकदा या हेअर मास्कचा वापर करा.
ग्रीक योगर्ट आणि मधाचा हेअर मास्क लावल्याने केस गळती थांबते, केस दाट आणि मजबूत होतात.
सारखे केससारखे धुवू नका
थंडीमध्ये केससारखे धुवू नका. सारखे केस धुतल्याने केसांमधील नॅचरल ऑइल (Natural Oil) निघून जाते. त्यामुळे केस कोरडे होतात. केस अठवड्यातून दोन वेळाच धुवावेत. केस धुताना कंडिश्नरचा वापर करा. त्यामुळे केस मॉयश्चराइझ होतात.
थंडीत केसांमध्ये कोंडा होतो. तसेच केस कोरडे होतात. त्यामुळे थंडीमध्ये केसांना नारळाचे तेल लावावे. नारळाचे तेल केसांना लावण्याआधी गरम करून घ्यावे. गरम नारळाच्या तेलाने केसांची मालिश केल्याने केसांच्या मुळांमध्ये रक्ताभिसरण (Blood Circulation) चांगले होते. तसेच केस स्मूथ आणि सिल्की होतात.
टीप: वरील माहितीची पुष्टी एबीपी माझा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधे हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावेत.
संबंधित बातम्या
Weight Loss Drink: हिवाळ्यात इम्युनिटी वाढवण्यासाठी 'हे' ज्युस प्या; झटपट कमी होईल वजन, काय आहे तयार करण्याची पद्धत?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)