Diabetes Control : मधुमेहावर नियंत्रण ठेवायचे आहे? मग 'हे' 5 पदार्थ नक्की खा
Food For Blood Sugar Control : मधुमेहाच्या रूग्णांनी फायबर आणि अँटीऑक्सिडंटनेयुक्त भरपूर आहार घ्यावा.
Food For Blood Sugar Control : मधुमेहाचा आजार माणसाला आयुष्यभर राहतो. या स्थितीत, आपले शरीर एकतर पुरेसे इंसुलिन तयार करत नाही किंवा उत्पादित इंसुलिनला प्रतिसाद देऊ शकत नाही. या संदर्भात डॉ. मंजू पांडा, मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, डायबिटीज एज्युकेटर सांगतात की, मधुमेहाच्या रुग्णांनी नियमित अंतराने खात राहावे जेणेकरून रक्तातील साखर अचानक कमी होणार नाही. याशिवाय फायबर आणि अँटीऑक्सिडंटनेयुक्त भरपूर आहार घ्यावा. यामध्ये विशेष काळजी घेतली पाहिजे की नाश्ता आणि दुपारच्या जेवणातील वेळ या दरम्यान काहीतरी हलके खाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यामध्ये तुमच्या जेवणाची विभागणी करताना तुम्ही तुमच्या आहारात रोज किती कॅलरीज घ्यायच्या आहेत हेही ध्यानात ठेवावे.
1. हंगामी फळे : कोणतेही हंगामी फळं खा ज्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. आणि ग्लायसेमिक इंडेक्स कमी असते ते तुमच्या रक्तातील साखरेतील चढउतार नियंत्रित करण्यास मदत करू शकतात.
2. पालक आणि कोबीचा रस : बर्याचदा भाज्या किंवा फळांच्या रसामध्ये फायबरचे प्रमाण कमी असते. या भाज्या ताज्या आणि नैसर्गिक असल्याची खात्री करा. तुम्हाला हवे असल्यास पालकाच्या ताज्या पानांमध्ये कोबीची पाने मिसळून त्यात थोडे पाणी घालून मिक्स करून असे प्या.
3. ड्रायफ्रूट्सचे मिश्रण करा : बदाम, भोपळ्याच्या बिया, काजू, तीळ, फ्लेक्ससीड्स आणि अक्रोड एकत्र करून तुम्ही घरगुती किशमिश शेक तयार करू शकता. तुम्ही हे खाऊ शकता. परंतु,हे लक्षात ठेवा की ते मर्यादित प्रमाणात सेवन केले पाहिजे.
4. टोमॅटो आणि कोथिंबीर सॅलड : कमी कॅलरी असलेले हे सॅलड तुमच्या दिवसात ताजेपणा आणू शकते. अगदी कमी वेळ असतानाही तुम्ही हे साधे सॅलड बनवू शकता. चिरलेला टोमॅटो, चिरलेली कोथिंबीर, लिंबाचा रस आणि काळी मिरी यांसारख्या सर्व गोष्टी मिसळून तुम्ही हे टोमॅटो सॅलड तयार करू शकता.
5. गाजर : गाजर सोलून स्वच्छ करा आणि लांब बारीक कापून घ्या. हा कमी-कार्ब स्नॅकसाठी एक उत्तम पर्याय आहे. जर तुम्हाला गाजर आवडत नसेल तर तुम्ही त्याऐवजी काकडी वापरू शकता.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :
- Health Tips : जेवल्यानंतर लगेच करु नका 'ही' चूक, आरोग्यावर होईल वाईट परिणाम
- Health Tips : उन्हाळ्यात आईसक्रीम खाताय? मग हे नक्की वाचा
- अति उष्णतेमुळे डोळे होऊ शकतात खराब, अशी घ्या डोळ्यांची काळजी
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )