एक्स्प्लोर

'हा' रक्तगट असणाऱ्या व्यक्तींना कोरोनाचा सर्वाधिक धोका; रिसर्चमधून खुलासा

आतापर्यंत कोरोना व्हायरसबाबत अनेक संशोधनं करण्यात आली. अशातच संशोधकांनी केलेल्या दाव्यानुसार, वेगवेगळ्या रक्तगटाच्या लोकांना कोरोनाचा धोकाही वेगवेगळ्या प्रमाणात असल्याचं बोललं जात आहे.

मुंबई : कोरोना व्हायरससारख्या जीवघेण्या व्हायरसने संपूर्ण जगाला वेठीस धरलं आहे. या व्हायरस संदर्भात अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहेत. तसेच व्हायरसवर अनेक संशोधनं देखील करण्यात येत आहेत. जगभरातील अनेक वैज्ञानिक या व्हायरसचा खात्मा करण्यासाठी लस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेकदा असा दावा करण्यात आला होता की, उन्हाळ्यात कोरोना व्हायरसचा प्रभाव कमी होईल, तर अनेकदा असं सांगण्यात आलं की, वयोवृद्ध लोकांना या व्हायरसचा अधिक धोका आहे. परंतु, आता वेगवेगळ्या रक्तगटाच्या लोकांना कोरोनाचा धोकाही वेगवेगळ्या प्रमाणात असल्याचं बोललं जात आहे. जर्मनी आणि नॉर्वेच्या संशोधकांनी यासंदर्भात दावा केला आहे.

जगभरात या व्हायरसवर अनेक संशोधनं केली जात असतानाच आता जर्मनी आणि नॉर्वेच्या संशोधकांनी कोरोनासोबत वेगवेगळ्या रक्तगटांच्या संबंधांचा अभ्यास केला. या संशोधनातून अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. या संशोधनातून समोर आलेल्या निष्कर्षांचा अहवाल 'न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन'मध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. संशोधकांनी या संशोधनासाठी इटली आणि स्पेनमधील 1610 रुग्णांची निरिक्षणं नोंदवली. ज्यामध्ये अनेकांना कोविड-19मुळे श्वास घेण्यास त्रास होत होता. हे सर्व रुग्णांची परिस्थिती कोरोनामुळे गंभीर झाली असून त्यापैकी अनेकांचा मृत्यूही झाला आहे.

संशोधनातून काय समोर आलं?

संशोधनानुसार, कोरोना व्हायरसचा सर्वाधिक धोका 'A' रक्तगट असणाऱ्या लोकांना आहे. तर 'O' रक्तगट असणाऱ्या लोकांना कोरोना व्हायरसची लागण होण्याचा धोका सर्वात कमी असल्याचं निष्पन्न झालं. संशोधातून निष्पन्न झाल्यानुसार, जर एखाद्या 'A' रक्तगट असणाऱ्या रुग्णाला कोरोनाची बाधा झाली तर त्याला ऑक्सिजनचा पुरवठा करण्याची किंवा व्हेंटिलेटरवर ठेवण्याची आवश्यकता 'O' रक्तगट असणाऱ्या रुग्णांपेक्षा दुप्पट असू शकते.

दरम्यान, संशोधकांनी अहवालातून स्पष्ट केलं आहे की, 'असं अजिबात नाही की, 'O' रक्तगट असणाऱ्या लोकांना कोरोना व्हायरसची लागण होऊच शकत नाही.' तसेच 'O' रक्तगट असणाऱ्या व्यक्ती युनिवर्सल डोनर म्हणून ओळखल्या जातात. म्हणजेच, जर दुसऱ्या कोणत्याही रुग्णाला रक्ताची गरज असेल तर त्याला 'O' रक्तगट असणाऱ्या व्यक्तीचं रक्त दिलं जाऊ शकतं.

(टिप : वरील बाबी संशोधनातून सिद्ध झालेल्या असून त्या केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. ABP माझा यातून कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Coronavirus | एकदा संसर्ग झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो का?

Corona Vaccine | कोरोनावरील लसीचा शोध कुठवर? जाणून घ्या जगातील सर्वात मोठ्या पाच संशोधनाबद्दल

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

महत्त्वाच्या बातम्या

Health Tips : मेहंदी लावलेल्या हाताने जेवणे किती धोकादायक? जाणून घ्या सत्य
मेहंदी लावलेल्या हाताने जेवणे किती धोकादायक? जाणून घ्या सत्य
Tea : गाड्यावर किती वेळापूर्वी बनवलेला चहा प्यावा? पुन्हा गरम केलेला चहा कधी बनतो विष?
गाड्यावर किती वेळापूर्वी बनवलेला चहा प्यावा? पुन्हा गरम केलेला चहा कधी बनतो विष?
Health: पावसाळ्यात कान-नाकाचा त्रास का वाढतो? संसर्ग होऊ नये यासाठी 'अशी' घ्या खबरदारी, डॉक्टर सांगतात...
पावसाळ्यात कान-नाकाचा त्रास का वाढतो? संसर्ग होऊ नये यासाठी 'अशी' घ्या खबरदारी, डॉक्टर सांगतात...
Dengue vs Typhoid: तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget