एक्स्प्लोर

Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज

Beed Hospital Negligence : बीड जिल्हा रुग्णालयात सीझर शस्त्रक्रियेदरम्यान 19 वर्षीय महिलेच्या पोटात हातमोजे आणि कागद राहिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित महिला सध्या मृत्यूशी झुंज देत आहे.

Beed Hospital Medical Negligence : बीडच्या जिल्हा रुग्णालयातून वैद्यकीय क्षेत्राला काळिमा फासणारी आणि डॉक्टरांच्या गंभीर हलगर्जीपणाची एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अवघ्या 19 वर्षांच्या संध्या सूरज गायकवाड या नवमातेच्या सीझर (सिझेरियन) शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांनी तिच्या पोटात हातमोजे (Surgical Gloves) आणि कागद तसाच सोडून टाकला. या निष्काळजीपणामुळे ही आई सध्या पुण्यातील ससून रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे.

संध्या गायकवाड यांच्यावर 1 ऑगस्ट रोजी बीड जिल्हा रुग्णालयात सीझर शस्त्रक्रिया झाली होती. शस्त्रक्रियेनंतर चार दिवसांनी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आले. मात्र घरी आल्यावर संध्या यांच्या पोटात असह्य वेदना सुरू झाल्या.

Beed Patient Sassoon Hospital Surgery : पुण्यातील ससूनमध्ये शस्त्रक्रिया

संध्या यांची प्रकृती सातत्याने बिघडत चालल्याने कुटुंबीयांनी त्यांना एका खासगी रुग्णालयात नेऊन तपासणी केली. सोनोग्राफी आणि इतर वैद्यकीय चाचण्यांनंतर त्यांच्या पोटात काहीतरी अनोळखी वस्तू अडकल्याचे निष्पन्न झाले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांना तातडीने पुण्याच्या ससून रुग्णालयात हलवण्यात आले. ससून रुग्णालयात पार पडलेल्या शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांनी संध्या यांच्या पोटातून सर्जिकल हातमोजे आणि कागद बाहेर काढल्याचा खळबळजनक दावा त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.

Beed Hospital Doctor Action : निष्काळजी डॉक्टरांवर कठोर कारवाईची मागणी

या घटनेमुळे बीड जिल्हा रुग्णालयातील कारभारावर प्रचंड चीड व्यक्त केली जात आहे. पीडित महिलेचे पती सूरज गायकवाड यांनी आरोप केला आहे की, डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच त्यांच्या पत्नीची ही गंभीर अवस्था झाली आहे. तर, "मुलीने बाळाला जन्म दिला, पण आज त्याला कुशीत घेण्याचीही तिच्यात ताकद उरलेली नाही," असा टाहो संध्या यांच्या आईने फोडला आहे.

Beed Civil Surgeon Statement : संबंधित डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा

या घटनेचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर बीडचे जिल्हा शल्यचिकित्सक ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. सीझर शस्त्रक्रिया करणाऱ्या संबंधित महिला डॉक्टर आणि उपस्थित वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आरोग्य विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले आहे.

ही बातमी वाचा:

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maratha Reservation: मोठी बातमी! मराठा आंदोलनातील मृतांच्या वारसांना MIDC मध्ये नोकरी मिळणार; राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाची माहिती
मोठी बातमी! मराठा आंदोलनातील मृतांच्या वारसांना MIDC मध्ये नोकरी मिळणार; राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाची माहिती
Samrudhi Mahamarg Robbery: समृद्धी महामार्गावरील लूट प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; फिल्मी स्टाईल सापळा रचून 7 आरोपींना ठोकल्या बेड्या, आरोपींची संख्या पोहचली 11वर
समृद्धी महामार्गावरील लूट प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; फिल्मी स्टाईल सापळा रचून 7 आरोपींना ठोकल्या बेड्या, आरोपींची संख्या पोहचली 11वर
Dhananjay Munde: धनंजय मुंडे यांच्या नव्या व्हिडीओची जोरदार चर्चा, 'काटे खोलवर रुतले आहेत,तरी पाऊल पुढे टाकतो आहे…'
धनंजय मुंडे यांच्या नव्या व्हिडीओची जोरदार चर्चा, 'काटे खोलवर रुतले आहेत,तरी पाऊल पुढे टाकतो आहे…'
Beed Crime News : पाण्यात गुंगीचे औषध देऊन वैद्यकीय विद्यार्थिनीसोबत नको ते कृत्य; व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल; अखेर नराधमावर बीडमध्ये गुन्हा दाखल
पाण्यात गुंगीचे औषध देऊन वैद्यकीय विद्यार्थिनीसोबत नको ते कृत्य; व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल; अखेर नराधमावर बीडमध्ये गुन्हा दाखल
Advertisement

व्हिडीओ

Pune DJ Morcha : पुण्यात डीजेविरोधात मोर्चा, विद्यानंद बापटांच्या दांडीची चर्चा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Uposhan : जरांगेंची आरपारची लढाई, मिशन आरक्षण Special Report
Rahul Gandhi on MPSC : MPSC वर भाजपचा ताबा? Special Report
OBC Vs Maratha : 2 सप्टेंबरचा GR रद्द करा, मनोज जरांगेंच्या अंतरवालीत ओबीसी आक्रमक
Raj Thackeray Thane Speech : अमित ठाकरेंनी पंतप्रधानांचा फोटो हटवला; आता राज ठाकरे इशारा देत म्हणाले
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अर्शदीप अन् समरीनचं प्रेम आता टॅटूत अवतरलं, एकानं 'SK' तर दुसऱ्यानं 'AS' गोंदवून घेतलं; समरीन कौर आहे तरी कोण?
अर्शदीप अन् समरीनचं प्रेम आता टॅटूत अवतरलं, एकानं 'SK' तर दुसऱ्यानं 'AS' गोंदवून घेतलं; समरीन कौर आहे तरी कोण?
Mangesh Sasane : मनोज जरांगे यांचा आंदोलन सरकार पुरस्कृत; मंगेश ससाणेंचा सरकारवर हल्लाबोल, म्हणाले, जरांगे मंत्र्यांना घाण घाण शिव्या देतो तेव्हा....'
मनोज जरांगे यांचा आंदोलन सरकार पुरस्कृत; मंगेश ससाणेंचा सरकारवर हल्लाबोल, म्हणाले, जरांगे मंत्र्यांना घाण घाण शिव्या देतो तेव्हा....'
Bank of Baroda : गुड न्यूज, बँक ऑफ बडोदामध्ये 1100 जागांवर भरती, 67 हजारांपासून पगार सुरु 
गुड न्यूज, बँक ऑफ बडोदामध्ये 1100 जागांवर भरती, 67 हजारांपासून पगार सुरु 
'अशा लोकांना रस्त्यावर फिरण्याचा अधिकार नाही, जेलमध्येच टाका..' कल्याण डॉक्टर हल्ला प्रकरणी शिवसेनेचा मारकुटा नगरसेवक रमेश म्हात्रेवर सुप्रीम कोर्टाचे ताशेरे, पालघरमधील घटनेची सुद्धा कोर्टाकडून दखल
'अशा लोकांना रस्त्यावर फिरण्याचा अधिकार नाही, जेलमध्येच टाका..' कल्याण डॉक्टर हल्ला प्रकरणी शिवसेनेचा मारकुटा नगरसेवक रमेश म्हात्रेवर सुप्रीम कोर्टाचे ताशेरे, पालघरमधील घटनेची सुद्धा कोर्टाकडून दखल
Manoj Jarange Patil and Raj Thackeray: देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंकडून प्रचार करुन घेतला अन् निवडणुकीत त्यांच्याच पोराला पाडलं: मनोज जरांगे पाटील
देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंकडून प्रचार करुन घेतला अन् निवडणुकीत त्यांच्याच पोराला पाडलं: मनोज जरांगे पाटील
Satara Crime News: गैरसोयींची पोलखोल केली अन्...; कॉलेजमधून काढण्याची धमकी, दबावाखाली आलेल्या विद्यार्थिनीची हॉस्टेलच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी; साताऱ्यातील घटना
गैरसोयींची पोलखोल केली अन्...; कॉलेजमधून काढण्याची धमकी, दबावाखाली आलेल्या विद्यार्थिनीची हॉस्टेलच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी; साताऱ्यातील घटना
MPSC Student Protest: 'तर कोल्हापुरी पायताण दाखवून जंतर मंतर पार्ट 2 झाल्याशिवाय राहणार नाही...' पुण्यानंतर कोल्हापुरातही एमपीएसी विद्यार्थ्यांचा रस्त्यावर उतरत आक्रोश
'तर कोल्हापुरी पायताण दाखवून जंतर मंतर पार्ट 2 झाल्याशिवाय राहणार नाही...' पुण्यानंतर कोल्हापुरातही एमपीएसी विद्यार्थ्यांचा रस्त्यावर उतरत आक्रोश
Vinod Tawde: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे प्रभारी झाल्यानंतर विनोद तावडे पहिल्यांदाच उत्तर प्रदेशात
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे प्रभारी झाल्यानंतर विनोद तावडे पहिल्यांदाच उत्तर प्रदेशात
Embed widget