एक्स्प्लोर

Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार

Satyendar Jain Arrest: आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे माजी मंत्री सत्येंद्र जैन यांना एसीबीनं अटक केली आहे. अरविंद केजरीवाल यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. 

Satyendar Jain Arrest:  नवी दिल्ली : आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीनं अटक केली आहे. मागील सरकारच्या काळातील दिल्ली जल बोर्डातील कथित भ्रष्टाचाराप्रकरणी एसीबीनं ही कारवाई केली आहे.  आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक आणि माजी मंत्री अरविंद केजरीवाल यांनीी भाजपवर हल्लाबोल केला आहे.  सत्येंद्र जैन यांना भाजपनं पुन्हा एकदा अटक केलं आहे. काही काळापूर्वी या लोकांनी जैन यांना तुरुंगात टाकून त्यांची जी परिस्थिती केली होती, ती सर्वांना माहिती आहे. पहिली केस खोटी होती, ही केस देखील खोटी सिद्ध होईल, असं केजरीवाल म्हणाले. 

भाजपची हुकूमशाही कधीपर्यंत चालणार, केजरीवालांचा सवाल

अरविंद केजरीवाल म्हणाले की अखेर कधीपर्यंत भाजपची हुकूमशाही सुरु राहणार आहे?  मनाला वाटेल तसे खोटे आरोप करुन तुरुंगात टाकतात. भाजपचा खोटेपणा पुन्हा देशासमोर येईल मात्र, तुरुंगात घालवलेला वेळ आणि मानसिक त्रास याची भरपाई कोण करणार? असा सवाल केजरीवाल यांनी केला. भाजपच्या पापाचा घडा आता भरला आहे, त्यांना कितीही हुकूमशाही करु द्यात, मोदी सरकारचा अंत निश्चित आहे. संपूर्ण आम आदमी पार्टी आणि देशातील जनता सत्येंद्र जैन यांच्यासोबत उभी असल्याचं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं.  

आपचे नेते मनीष सिसोदिया यांनी देखील एक्सवर पोस्ट केली आहे. पंजाब निवडणुकीपूर्वी पंजाबचे सहप्रभारी सत्येंद्र जैन यांना अटक करण्यात आली आहे. यापूर्वी अडीच वर्षांपर्यंत खोट्या प्रकरणात सत्येंद्र जैन यांना तुरुंगात ठेवण्यात आलं. आता आणखी एक खोटं प्रकरण काढलं आहे, असं सिसोदिया म्हणाले. जेन झी आंदोलन, राम मंदिरातील दान चोरी आणि ई 20 च्या मुद्यांवरुन अडचणीत असलेली भाजप आता पुन्हा एकदा ईडी, एसीबी आणि सीबीआयच्या जुन्याच निवडणुकीतील फॉर्म्युल्याचा वापर करत असल्याचा आरोप सिसोदिया यांनी केला. 

भाजपचा आपवर पलटवार

दिल्ली भाजपचे माजी अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी आपवर पलटवार केला आहे. सोशल मीडिया एक्सवर पोस्ट करत ते म्हणाले की दिल्लीला लुटणाऱ्यांचा खरा चेहरा समोर आला आहे. आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्ली सरकारमधील माजी मंत्री सत्येंद्र जैन यांच्याविरोधात मोठी कारवाई, एसीबीनं दिल्ली जल बोर्डाच्या एसटीपी टेंडर घोटाळ्यातील अनियमितता आणि भ्रष्टाचार प्रकरणात सत्येंद्र जैन यांना अटक केलं असल्याचा दावा सचदेवा यांनी केला.  

जनतेच्या पैशांवर टेंडरमधील हेराफेरी आणि कोट्यवधींची लाच, हेच आपचे ईमानदार मॉडेल असल्याचं  वीरेंद्र सचदेवा यांनी म्हटलं. पाणी आणि स्वच्छतेच्या नावावर मतं मागितली, कमिशनखोरी केली गेल्याचा आरोप सचदेवांनी केला. दिल्लीच्या जनतेनं यांचं सत्य ओळखलं होतं, आता एका एका चोरीचं उत्तर देण्याची जबाबादरी आपची असल्याचा दावा सचदेवांनी केला. अरविंद केजरीवाल यांनी केलेली पापं जनतेसमोर आल्याचं देखील सचदेवा म्हणाले.

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bangladesh : भारतावर जळणारा बांगलादेश अंधारात, मदतीसाठी भारताकडे याचना; परराष्ट्र मंत्रालय म्हणाले, आमच्या गरजा लक्षात घेऊन...
भारतावर जळणारा बांगलादेश अंधारात, मदतीसाठी भारताकडे याचना; परराष्ट्र मंत्रालय म्हणाले, आमच्या गरजा लक्षात घेऊन...
तुम्हाला UPSC तयारी करायचीय? मुख्य परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किती लागतात गुण? गेल्या तीन वर्षातील कट ऑफ किती? 
तुम्हाला UPSC तयारी करायचीय? मुख्य परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किती लागतात गुण? गेल्या तीन वर्षातील कट ऑफ किती? 
देशात रोजगाराच्या बाबातीत उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्राचा कितवा नंबर? इंडिया स्किल्स रिपोर्टमधून महत्वाची माहिती समोर
देशात रोजगाराच्या बाबातीत उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्राचा कितवा नंबर? इंडिया स्किल्स रिपोर्टमधून महत्वाची माहिती समोर
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Advertisement

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Embed widget