Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Mumbai Auto Driver Marathi Dispute : मुंबईत रिक्षा चालवायची असेल तर मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयाला उत्तर भारतीय रिक्षा चालकाने आव्हान दिलं असून मराठी बोलणार नाही असं तो म्हणतोय.

मुंबई : महाराष्ट्रासह मुंबईत रिक्षा चालवायची असेल तर मराठीचं ज्ञान आवश्यक आहे. रिक्षा चालकाला जर किमान मराठी येत नसेल तर त्याचा परवाना रद्द(Driving License) करण्यात येणार आहे. मात्र परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतलेल्या या निर्णयाला काही मुजोर उत्तर भारतीय रिक्षा चालकांनी विरोध केला आहे. मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार, पण मराठी बोलणार नाही, अशी भूमिका एका रिक्षा चालकाने सोशल मीडियावर जाहीर केली आहे.
नवी मुंबईच्या उत्तर भारतीय विकास सेनेचा अध्यक्ष संजय दुबे याने मुजोरपणा दाखवत ही भूमिका घेतली आहे. जा.. मराठी बोलणार नाही, अशा शब्दात या रिक्षा चालकाने मुजोरपणा दाखवला आहे.
राज्यातील सर्व रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणे अनिवार्य असून मराठी भाषा न येणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई केली जाणार आहे. मात्र मराठी भाषेची सक्ती रिक्षा, टॅक्सी चालकांना करू नका, महाराष्ट्रात रिक्षा चालव, पैसे कमावू, मात्र मराठी बोलणार नाही अशा प्रकारची भूमिका काही उत्तर भारतीय संघटनांनी घेतली आहे.
Auto Driver Video Challenge : काय म्हणाला मुजोर रिक्षा चालक?
उत्तर भारतीय रिक्षा चालक असलेला संजय दुबे याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात तो म्हणतोय की, जो उत्तर भारतीय रिक्षा चालक मराठी बोलणार नाही त्याचे लायसन्स रद्द करण्यात येईल असा इशारा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. पण मी रिक्षा पण चालवणार, पैसे देखील कमावणार आणि मराठीही बोलणार नाही. जा.. मराठी बोलणार नाही.
प्रताप सरनाईक यावर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, "काही केलं तरी मराठी भाषा शिकणार नाही अशी भूमिका घेणाऱ्या मुजोर रिक्षा, टॅक्सी चालकांवर परिवहन विभाग त्यासोबतच आरटीओ विभाग कारवाई करेल. या निर्णयाविरोधात काहीजण व्हिडीओ व्हायरल करत आहेत आणि मराठी भाषा शिकणारच नाही असं म्हणत आहेत. त्यांच्या विरोधात कायद्याच्या चौकटीत कारवाई केली जाईल. त्यासाठी नियमावली बैठकीत तयार केली जाणार आहे."
Maharashtra Motor Vehicle Rules : मराठी न आल्यास लायसन्स कायमस्वरूपी रद्द
महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 (Maharashtra Motor Vehicles Rules 2026) मध्ये करण्यात आलेल्या सुधारणांनुसार, प्रवाशांशी संवाद साधण्यासाठी चालकाला मराठी भाषेचे व्यवहारिक ज्ञान असणे आवश्यक आहे.
1 महिन्याची नोटीस: मराठी न येणाऱ्या चालकाला सुरुवातीला एक महिन्याची नोटीस देऊन भाषा शिकण्याची संधी दिली जाईल.
3 महिन्यांसाठी निलंबन: नोटीस देऊनही मराठी न शिकल्यास चालकाचे लायसन्स ३ महिन्यांसाठी निलंबित केले जाईल.
कायमस्वरूपी रद्द: त्यानंतरही नियमाचे पालन न केल्यास चालकाचा परवाना कायमस्वरूपी (Permanently Cancelled) रद्द करण्याची तरतूद करण्यात आली आहे.
App Based Taxi Marathi Rule : ॲप आधारित टॅक्सी चालकांनाही नियम लागू
शासनाच्या नवीन अधिसूचनेनुसार, ही अट केवळ साध्या रिक्षा-टॅक्सी चालकांसाठीच नाही, तर ॲप-आधारित (App-based cabs) मोटार कॅब चालकांसाठीही तितकीच बंधनकारक असणार आहे. मराठी भाषेचा आदर न करणाऱ्या आणि नियम मोडणाऱ्या चालकांविरोधात प्राधिकरणाला तात्काळ कारवाई करण्याचे पूर्ण अधिकार देण्यात आले आहेत.
ही बातमी वाचा:
Before You Go
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती






















