Benefits of Black Pepper : आहारात काळी मिरीचा समावेश करा, आरोग्यासह त्वचेसाठीही आहे फायदेशीर
Black Pepper Nutritional Value : काळी मिरीचं सेवन केल्यास याचा आरोग्यासाठी फायदा तर होईलच शिवाय तुमच्या त्वचेसाठीही लाभदायक ठरेल.
Black Pepper Nutritional Value : काळी मिरी (Black Pepper) आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते. याचं सेवन करण्यासाठी विविध प्रकार आहेत. आपल्या स्वयंपाक घरात सहज उपलब्ध असणारी काळी मिरी तुमच्या आरोग्यासाठी आणि तुमच्या त्वचेसाठी अतिशय गुणकारी आहे. स्वयंपाक घरात जेवणाची चव वाढवणारी काळी मिरी अतिशय उपयुक्त आहे. सर्दी, खोकला यांसारख्या आजारांसह इतरही अनेक आजार दूर करण्यास काळी मिरी मदत करते. या छोट्याश्या मसाल्याचे बहुतेक फायदे तुम्हाला ठाऊक नसतील. आम्ही तुम्हाला आज काळी मिरीचे वेगवेगळे फायदे (Benefits of Black Pepper) सांगणार आहेत. ते काय आहेत ते वाचा सविस्तर.
काळी मिरीचे फायदे (Benefits of Black Pepper)
- भारतीय मसाल्यांमधील महत्त्वाचा पदार्थ म्हणजे काळी मिरी. काळी मिरी हा औषधांचा खजिना आहे. परदेशातही काळी मिरीची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. काळी मिरीचे फायदे जाणून घ्या.
- काळ्या मिरीच्या सेवनाने सर्दी, खोकला आणि फ्लू यांसारख्या आजारांवर नियंत्रण मिळवता येते.
- काळी मिरी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचं काम करते.
- काळी मिरी सांधेदुखीतपासूनही आराम देते.
- काळी मिरी वात दोष दूर करण्यासाठी फायदेशीर आहे.
- काळी मिरी शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते.
- शरीरातील अतिरिक्त चरबी दूर करायची असेल तर रोज काळी मिरीचं सेवन करा.
- केसगळती, कोंडा आणि बुरशी दूर करण्यासाठी काळी मिरी उपयुक्त आहे.
- काळी मिरी कर्करोगाशी लढण्यास मदत करते.
काळी मिरीचं सेवन कसं करावं?
- रोज सकाळी रिकाम्या पोटी काळी मिरीचं चघळून किंवा चोखून सेवन करा. यामुळे तुमचे हार्मोन्स संतुलित राहण्यास मदत होईल. काळी मिरीचं सेवन मासिक पाळी नियमित करण्यासही फायदेशीर आहे. याशिवाय मधुमेह टाळण्यास देखील याचा फायदा होतो. काळी मिरीच्या सेवनाने श्वसनासंबंधित समस्याही दूर होतात तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढते.
- रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी हळद, मध आणि काळी मिरी पावडर एकत्र मिसळून याचं सेवन करा.
- सांधेदुखीचा त्रास असल्यास रात्री झोपताना दुधात चिमूटभर सुंठ आणि काळी मिरी मिसळून सेवन करा.
- मानसिक आरोग्यासाठी रात्री झोपताना एक चमचा तुपात काळी मिरी टाकून सेवन करा.
दरम्यान, काळी मिरी आरोग्यासाठी फायदेशीर असली तरी याचा अतिरिक्त वापर नुकसानकारक ठरु शकतो. त्यामुळे याचं सेवन डॉक्टरांच्या सल्ल्याने करावं.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्त्वाच्या इतर बातम्या
- Black Pepper for Men : पुरुषांसाठी काळी मिरी गुणकारी; 'या' समस्या करते दूर
- Corona Virus : इम्युनिटीच्या फंद्यात जास्त काळीमिरी खाताय? फायद्याऐवजी होईल मोठे नुकसान!
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )