Corona Virus : इम्युनिटीच्या फंद्यात जास्त काळीमिरी खाताय? फायद्याऐवजी होईल मोठे नुकसान!
black pepper Side effects : इम्युनिटीचा विचार करून तुम्ही देखील भरपूर काळ्यामिरीचे सेवन करत असाल, तर सावधान! यामुळे फायद्याऐवजी नुकसानच अधिक होऊ शकते.
black pepper side effects : जगभरात कोरोनाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे. या दरम्यान आपली रोगप्रतिकारकशक्ती वाढावी यासाठी लोक नानाविध उपाय करत आहेत. भारतामध्ये लोकांनी यासाठी अनेक घरगुती उपायांचा अवलंब केला, ज्यामध्ये काळीमिरी खाण्याचा ट्रेंड देखील वाढला. आहारात काळीमिरी, कळीमिरीचा काढा आणि अनेक वेगवेगळ्या प्रकारे काळ्यामिरीचे सेवन केले गेले. मात्र, इम्युनिटीचा विचार करून तुम्ही देखील भरपूर काळ्यामिरीचे सेवन करत असाल, तर सावधान! यामुळे फायद्याऐवजी नुकसानच अधिक होऊ शकते.
काळ्यामिरीच्या वापरामुळे खोकला, सर्दी आणि घसादुखीपासून मुक्तता मिळते. यात अँटी-मायक्रोबियल, अँटी-इंफ्लेमेटरी घटक असतात, जे यकृत, किडनी आणि आतड्यांचे संरक्षण करतात. मात्र, जास्त काळीमिरी खल्याने नुकसान देखील होऊ शकते. काळीमिरी जास्त प्रमाणात खाण्याचे काय तोटे आहेत, ते जाणून घेऊया...
त्वचेच्या समस्या
जर एखाद्याला सुंदर दिसायचे असेल, तर त्वचेत ओलावा असणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत काळीमिरीसारखा गरम पदार्थ खाल्ल्याने त्वचेची जळजळ आणि त्वचा रोग देखील होऊ शकतात. उष्णतेमुळे चेहऱ्यावर पिंपल्स दिसू शकतात.
पोटात उष्णता वाढते
काळीमिरी जास्त प्रमाणात खाल्ल्याने पोटात जळजळ आणि उष्णता वाढते, ज्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. काळी मिरी उष्ण असते, अशा स्थितीत पित्ताशी संबंधित आजाराने त्रस्त असलेल्या लोकांनी ती जास्त प्रमाणात खाऊ नये.
गर्भधारणेमध्ये नुकसान
गरोदर महिलांनी काळीमिरी मर्यादित प्रमाणात खावी. कारण, ती प्रभावाने उष्ण असते आणि त्याचा गर्भातील बाळावर वाईट परिणाम होतो. हिवाळ्यातही याची विशेष काळजी घेतली पाहिजे.
श्वास घेण्यास त्रास
काळीमिरी जास्त खाल्ल्याने श्वासोच्छवासाचा त्रास होतो, ज्यामुळे श्वसनाचा त्रास वाढू शकतो. त्यामुळे ऑक्सिजनच्या प्रवाहावर देखील परिणाम होतो.
पोटाची समस्या
काळीमिरी जास्त खाल्ल्याने पोटाच्या समस्या असणाऱ्या रुग्णांमध्ये या समस्या आणखी वाढू शकतात. जर, तुम्हाला अल्सर असेल, तर कळीमिरी खाणे टाळणे महत्वाचे आहे. डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय अधिक काळीमिरी खाऊ नका.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
संबंधित बातम्या :
- Covid-19 : Omicron variant दरम्यान, लवंग, मेथी आणि तुळस 'या' प्रकारे करा सेवन, घसादुखीही होईल दूर
- Omicron Variant: नखांचा रंग बदलणे असू शकते ओमायक्रॉनचे लक्षण, चुकूनही करू नका दुर्लक्ष!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )