Apple Cider Vinegar : वजन कमी करण्यासह त्वचेची चमक वाढवेल, ॲपल सायडर व्हिनेगरचे भन्नाट फायदे
Health Benefits of Apple Cider Vinegar : ॲपल सायडर व्हिनेगरच्या सेवनामुळे वजन कमी करण्यासोबतच त्वचेवर नवीन चमक आणण्यासही मदत होते.
Health Tips : ॲपल सायडर व्हिनेगर (ACV) आरोग्यासाठी अतिशय लाभदायक आहे. याचा योग्य प्रमाणात वापर केल्यास आरोग्याला अनेक फायदे होऊ शकतात. यामध्ये अनेक पोषक तत्वे असतात, ज्यामुळे आरोग्या सुधारण्यास मदत होते. ॲपल सायडर व्हिनेगरच्या (Apple Cider Vinegar) सेवनामुळे वजन कमी करण्यासोबतच त्वचेवर नवीन चमक आणण्यासही मदत होते. ॲपल सायडर व्हिनेगर हे सफरचंदाचा रस आंबवून म्हणजेच फर्मेंट (Fermented) करून त्यामध्ये यीस्ट आणि साखर मिसळून तयार करतात. याच्या सेवनामुळे ह्रदयाचे आरोग्य सुधारण्यास आणि रक्तातील साखर नियंत्रित होण्यासही मदत होते.
ॲपल सायडर व्हिनेगरचे फायदे
वजन कमी करण्यासाठी फायदेशीर
ॲपल सायडर व्हिनेगरच्या सेवनाने वजन कमी होण्यास मदत होते. यामध्ये असलेले ऍसिड आपली भूक कमी करण्यास मदत करते आणि अन्न खाल्ल्यानंतरही आपल्याला लवकर पोट भरते.
पचन सुधारणे
ॲपल सायडर व्हिनेगरचे सेवन केल्याने पचनक्रिया सुधारते, ज्यामुळे बद्धकोष्ठता, गॅस अशा अपचनाच्या समस्या दूर होण्यास मदत होते.
रोगप्रतिकारक शक्ती सुधारते
ॲपल सायडर व्हिनेगरमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी यांचे मिश्रण आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते, ज्यामुळे व्हायरल आजारांपासून आपलं संरक्षण होतं.
कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत
ॲपल सायडर व्हिनेगरचे सेवन केल्याने कोलेस्टेरॉल नियंत्रित राहते. याशिवाय हृदयाचे आरोग्य राखण्यास मदत होते.
ॲपल सायडर व्हिनेगरचं सेवन कसं करावं?
ॲपल सायडर व्हिनेगरचं सेवन योग्य प्रकारे आणि योग्य प्रमाणत करणे आवश्यक आहे.
ॲपल सायडर व्हिनेगरचे सेवन कसे करावे ?
पद्धत 1 :
ॲपल सायडर व्हिनेगर पाण्यात मिसळून पिणे हा सर्वात सोपा आणि चांगला मार्ग आहे. एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा ॲपल सायडर व्हिनेगर मिसळून ते रिकाम्या पोटी प्यायलाने फायदा होतो.
पद्धत 2 :
जर पाण्यासोबत ॲपल सफरचंद सायडर व्हिनेगरची पिताना त्याची चव वाढवायची असेल तर तुम्ही त्यात थोडे मध मिसळून ते पिऊ शकता.
पद्धत 3 :
तुम्ही सॅलडवर सॉस किंवा ड्रेसिंग म्हणून एक चमचा ॲपल सायडर व्हिनेगर देखील वापरू शकता. यामुळे तुमच्या सॅलड चविष्ट होईल आणि आरोग्यदायी फायदेही मिळवता येतील.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Frequent Thirst In Winter : हिवाळ्यात सारखी तहान लागतेय? 'या' गंभीर आजारांची लक्षणे, वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )