एक्स्प्लोर

Health Tips : रात्री झोप येत नाही ही तक्रारच संपून जाईल, लागेल गाढ झोप, खा 'हे' पाच पदार्थ

झोप न येण्याच्या समस्येमुळे वेगवेगळे आजार देखील उद्भवू शकतात. अपुऱ्या झोपेमुळे डोकेदुखी, चिडचिड होणे, लक्ष्य विचलित होणे असे परिणाम शरीरावर दिसू लागतात.

5 Best Food For Better Sleep : शरीर निरोगी ठेवण्यासाठी आहारासोबतच चांगली झोपही आवश्यक असते. पुरेशी झोप न मिळाल्यास त्याचा परिणाम आरोग्यावरही दिसून येतो. फोनच्या अतिवापरामुळे लोकांचे झोपेचे चक्र बिघडले आहे. काही लोकांना झोपण्यासाठी तासनतास झगडावे लागते. एकदा झोपेचे चक्र बिघडले की, ते सोडवणे इतके सोपे नसते. झोप न येण्याच्या समस्येमुळे काही लोकांना वैद्यकीय उपचारही घ्यावे लागतात. झोप न येण्याच्या समस्येमुळे वेगवेगळे आजार देखील उद्भवू शकतात. अपुऱ्या झोपेमुळे डोकेदुखी, चिडचिड होणे, लक्ष्य विचलित होणे असे परिणाम शरीरावर दिसू लागतात. या सर्वांचा आपल्या कार्यक्षमतेवर दुष्परिणाम होतात. अपुऱ्या झोपेमुळे रक्तदाब, मधुमेह, हृदयविकारांनाही आयते आमंत्रण मिळते. मात्र, जर तुम्हालाही अशाच समस्येचा सामना करावा लागत असेल तर आम्ही तुम्हाला अशाच काही पदार्थांबद्दल सांगणार आहोत, ज्यांच्या सेवनाने तुम्हाला गाढ झोप येईल.

बदाम

जेव्हा कधी स्मरणशक्ती वाढवण्याचा विचार येतो तेव्हा बदामाचे नाव सर्वात आधी घेतले जाते. पण याशिवाय चांगल्या झोपेसाठीही हे फायदेशीर आहे. ज्या लोकांना रात्री झोपेचा त्रास होतो त्यांनी बदाम जरूर खावे. किती बदाम खावेत हे बहुतेकांना माहिती नसते, तर झोपण्यापूर्वी 2 बदाम खावेत.

दूध

दूध हा संपूर्ण आहार म्हणून ओळखला जातो. कॅल्शियम मुबलक प्रमाणात असल्यामुळे दुधामुळे झोपेची समस्याही कमी होते. झोपेच्या समस्येत रात्री हळदीचे दूध प्यावे. झोपण्याच्या सुमारे 30 मिनिटे आधी हळदीचे दूध प्यायल्याने चांगली झोप लागते.

मासे

तुम्हाला हे ऐकून विचित्र वाटेल, पण मासे खाल्ल्याने झोपेच्या समस्याही सुधारतात. माशांमध्ये व्हिटॅमिन-डी आणि ओमेगा ३ फॅटी अॅसिड आढळतात, ज्यामुळे झोपेची समस्या कमी होण्यास मदत होते.

केळी

केळीमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते. पण शरीराला बळ देणारे हे फळ झोपेच्या समस्येतही खूप फायदेशीर आहे. रोज सकाळी केळी खाल्ल्याने झोपेची समस्या दूर होण्यास मदत होते.

अक्रोड 

चांगली झोप येण्यासाठी अक्रोड खाणे अधिक प्रभावी मानले जाते. अक्रोड सारख्या नट्सला मेलाटोनिनचा चांगला स्रोत मानले जाते. या नट्समध्ये फॅटी अ‍ॅसिड देखील असते, जे आपल्याला चांगली झोप येण्यास मदत करते. याव्यतिरिक्त, त्यात अल्फा लिनोलेनिक अ‍ॅसिड असते जे ओमेगा -३ फॅटी ऍसिडचा एक प्रकार आहे. हे शरीरात डीएचएमध्ये बदलते आणि चांगली झोप आणण्यास मदत करते.

इतर महत्वाच्या बातम्या

Health Tips : दिवसभर जांभई येणं म्हणजे थकवा नाही; असू शकतात 'या' आजारांची लक्षणं, वेळीच सावध व्हा

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Ravindra Waykar on EVM : ईव्हीएमसोबत छेडछाड केल्याचा प्रश्नच येत नाही, रवींद्र वायकरांची प्रतिक्रियाABP Majha Headlines : 04 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सRavindra Waykar : मंगेश पडिलकरजवळचा फोन निवडणूक अधिकाऱ्याचा? ड्रायव्हर बोलवण्यासाठी फोन वापरल्याचा दावाMaharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha 04 PM

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
Embed widget