Health Tips : रोज 15 मिनिटे व्यायाम आणि 'इतक्या' तासांची झोप मधुमेहाच्या रूग्णांसाठी गरजेची; वाचा तज्ज्ञांचा सल्ला
Diabetes and Sleep : मधुमेह टाळण्यासाठी जीवनशैली आणि आहार सुधारणे आवश्यक आहे.
Diabetes and Sleep : देशात मधुमेहाच्या (Diabetes) रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. याचं मुख्य कारण म्हणजे आपला आहार आणि बिघडलेली जीवनशैली. या दोन गोष्टी मधुमेहासाठी जबाबदार आहेत. पण, यामध्ये आणखी एक महत्त्वाचे कारण आहे ज्यामुळे मधुमेहाची समस्या उद्भवू शकते. ते म्हणजे आपली अपुरी झोप. झोप कमी झाल्यामुळे देखील मधुमेहाची समस्या वाढू शकते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जर तुम्हाला दररोज चांगली झोप येत असेल तर रक्तातील साखर नियंत्रणात राहते आणि मधुमेहाचा धोका कमी असतो. चला जाणून घेऊयात किती तासांची झोप मधुमेहाचा धोका कमी करू शकते.
पुरेशा झोपेमुळे मधुमेहाचा धोका कमी होतो
कॅलिफोर्निया विद्यापीठानेही याबाबत संशोधन केले आहे. यामध्ये 500 लोकांच्या झोपण्याच्या पद्धतीचा अभ्यास करण्यात आला. या संशोधनात असे आढळून आले की, जे लोक रोज 8 तास झोपतात त्यांच्या शरीरात पॅरा सिंथेटिक खूप सक्रिय राहते. त्यामुळे शुगर लेव्हल सुरळीत राहते आणि शरीराचा समतोल राहतो. या संशोधनात असेही आढळून आले आहे की, जे लोक चांगले झोपतात त्यांच्यामध्ये इन्सुलिनचा प्रतिसाद वाढतो आणि साखरेची पातळी वाढत नाही. म्हणूनच रोज 8 तासांची झोप घेणे आवश्यक आहे.
चांगली झोप आणि रोजचा व्यायाम आवश्यक आहे
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जीवनशैली सुधारण्यासाठी चांगली झोप खूप महत्त्वाची आहे. यासाठी रोज व्यायाम करावा. जर तुम्ही दररोज 15 मिनिटे व्यायाम केलात तर तुम्हाला चांगली झोप लागते. वेगाने चालणे, सायकल चालवणे, दोरीवर उडी मारणे आणि जॉगिंग हे व्यायामाचे चांगले पर्याय आहेत. यामुळे शरीर तंदुरुस्त राहते, चांगली झोप लागते आणि साखरेची पातळी नियंत्रणात राहते, ज्यामुळे मधुमेहाचा धोका कमी होतो.
अन्न चांगले ठेवा
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, उत्तम जीवनशैलीबरोबरच चांगले अन्न खाल्ल्याने झोपही चांगली येते. त्यामुळे रात्री चहा-कॉफी न पिण्याचा प्रयत्न करा आणि झोपण्याच्या किमान दोन तास आधी अन्न खा. अन्न खाल्ल्यानंतर काही वेळ चाला. तर तुमचं अन्न नीट पचन होईल आणि तुम्हाला चांगली झोप लागेल.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :