Health Tips : दिवसभर जांभई येणं म्हणजे थकवा नाही; असू शकतात 'या' आजारांची लक्षणं, वेळीच सावध व्हा
Excessive Yawning : सामान्यतः, जेव्हा लोक थकलेले असतात, तेव्हा त्यांचे हार्मोन्स शरीराला सतर्क करण्यासाठी जांभई देतात.
Excessive Yawning : जांभई येणं किंवा ज्याला सामान्य भाषेत आळस येणं असं आपण म्हणतो ही थकलेल्या शरीराची एक सामान्य प्रक्रिया आहे. जेव्हा आपल्याला कंटाळा येतो तेव्हा आपण जांभई देऊ लागतो. सामान्यतः, जेव्हा लोक थकलेले असतात, तेव्हा त्यांचे हार्मोन्स शरीराला सतर्क करण्यासाठी जांभई देतात. ही एक सामान्य वैद्यकीय प्रक्रिया आहे, परंतु, जर तुम्हाला वारंवार जांभई येत असेल तर हे सामान्य लक्षण असू शकत नाही. खरंतर, दिवसभर वारंवार जांभई येणं हे अनेक आरोग्य समस्यांचं लक्षण दर्शवते. जाणून घेऊयात जर तुम्हाला वारंवार जांभई येत असेल तर ते शरीरासाठी कसे आणि किती धोकादायक ठरू शकते.
पाच मिनिटांत तीनपेक्षा जास्त जांभई येणे असामान्य आहे
आरोग्य तज्ञ म्हणतात की जर एखाद्याला दिवसातून तीन ते चार वेळा जांभई येत असेल तर ती सामान्य असू शकते. पण, जर तुम्ही पाच मिनिटांत तीनपेक्षा जास्त वेळा जांभई देत असाल तर ही एक असामान्य प्रक्रिया आहे. यामागचे पहिले लक्षण म्हणजे तुमच्या शरीराला खूप झोपेची गरज असते. झोप पूर्ण न झाल्यामुळे वारंवार जांभई येते. हे स्लीप एपनियाचे लक्षण असू शकते. अनेक वेळा कामाचा ताण, निद्रानाश, घोरणे किंवा थकवा यांमुळे लोकांना पूर्ण आणि चांगली झोप येत नाही आणि त्यांना झोपेचा विकार होतो. अशा परिस्थितीत जांभई वारंवार येते.
जास्त औषध खाल्ल्यानेही जांभई येऊ शकते
आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जर तुम्ही दीर्घकाळ काही औषधे घेत असाल तर त्यामुळे तुम्हाला वारंवार जांभई येऊ शकते. खरंतर, अशा औषधांमध्ये अँटीसायकोटिक्स किंवा अँटीडिप्रेसेंट्सचे गुणधर्म असतात, ज्यामुळे जांभई जास्त येते. कधीकधी मेंदूच्या विकारामुळे, जांभई देखील वारंवार येते. पार्किन्सन्स, मायग्रेन, मल्टिपल स्क्लेरोसिस यांसारख्या मेंदूशी संबंधित आजारांमुळे व्यक्ती वारंवार जांभई देतात. एखाद्याला चिंता किंवा तणावाची समस्या असली तरी पुन्हा पुन्हा जांभई दिली जाते.
ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे जांभई देखील येते
वारंवार जांभई येणे हे तुमचे हृदय धोक्यात असल्याचे लक्षण असू शकते. खरंतर, जेव्हा शरीरात ऑक्सिजनची कमतरता असते तेव्हा पुन्हा पुन्हा जांभई येते. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे हृदयविकाराचा धोका सर्वाधिक असतो. जास्त जांभई येणे हे हृदयविकाराच्या झटक्याचे थेट लक्षण नसले तरी ते शरीराला ऑक्सिजनचा कमी पुरवठा दर्शवू शकते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :