Health Tips : रात्रभर झोपल्यानंतरही दिवसा झोपावंसं वाटत असेल तर सावधान; 'ही' असू शकते गंभीर समस्या
Health Tips : ज्याप्रमाणे आवश्यकतेपेक्षा कमी झोपणे हानिकारक आहे, त्याचप्रमाणे जास्त झोपणे देखील शरीराला हानी पोहोचवू शकते.

Health Tips : खूप व्यस्त दिनश्चर्येनंतर दिवसभर थकवा येणं स्वाभाविक आहे. थकल्यानंतर तुम्हाला रात्री चांगली झोप लागते आणि ही झोप सकाळी तुम्हाला नवीन दिवस सुरू करण्यासाठी रिचार्ज करते. व्यक्तीला 6 ते 8 तासांची झोप पुरेशी मानली जाते ज्यामुळे दुसऱ्या दिवशी ऊर्जा मिळते. पण जर तुम्ही अशा लोकांपैकी असाल ज्यांना दिवसभर थकवा येतो आणि झोप येते, तर तुम्ही सावध राहायला हवे. ज्याप्रमाणे आवश्यकतेपेक्षा कमी झोपणे हानिकारक आहे, त्याचप्रमाणे आवश्यकतेपेक्षा जास्त झोपणे देखील शरीराला हानी पोहोचवू शकते. आज आम्ही तुम्हाला या बातमीत सांगणार आहोत की, तुम्हाला जास्त झोप का येते? जास्त झोपेची कारणे कोणती असू शकतात आणि त्यापासून मुक्त होण्यासाठी काय करावं. चला तर जाणून घेऊयात.
जास्त झोप अनेक आजारांना आमंत्रण देते
रात्रीची झोप चांगली असूनही दिवसभर झोप येत असेल तर ते अनेक आजारांचं निमंत्रण असू शकतं. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जर तुम्हाला दिवसभर थकवा आणि झोप येत असेल तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
झोपेची अनियमित पद्धत
सतत बिघडत चाललेल्या जीवनशैलीमुळे लोकांच्या झोपेची पद्धत बिघडत चालली आहे. याच कारणामुळे ज्या लोकांची झोपण्याची आणि उठण्याची वेळ निश्चित नसते किंवा त्यात रोज बदल होत असतो, अशी लोकं जास्त झोपेच्या समस्येला बळी पडतात.
एनर्जी ड्रिंक हे कारण असू शकते
शरीराला ऊर्जा देण्यासाठी एनर्जी ड्रिंक्स घेण्याची सवय असली तरी जास्त झोपेची समस्या तुम्हाला जाणवू शकते. जास्त एनर्जी ड्रिंक घेतल्याने तुमची झोपेची पद्धत बिघडते आणि तुमच्या शरीराला हानी पोहोचते.
शारीरिकरित्या सक्रिय नसणे
जे लोक शारीरिक हालचालींपासून दूर पळतात किंवा शरीराची फार कमी हालचाल करतात अशा लोकांमध्ये आळस आणि थकवा जास्त दिसून येतो. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला जास्त झोपण्याची समस्या टाळायची असेल तर शरीराची हालचाल आणि व्यायाम आवश्यक आहे.
अशा प्रकारे जास्त झोपेपासून मुक्त व्हा
दिवसभर काम असूनही तुम्हाला झोप येत असेल आणि कामावर लक्ष केंद्रित करता येत नसेल, तर जास्त झोपेच्या समस्येने तुम्हाला घेरले आहे. अशा परिस्थितीत, आज आम्ही काही उपाय सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने आपण या समस्येपासून मुक्त होऊ शकतो.
झोपेची पद्धत राखणे
जर तुमची रात्री झोपण्याची आणि सकाळी उठण्याची वेळ निश्चित असेल तर तुमचे शरीर देखील तुम्हाला चांगली साथ देईल. त्यामुळे झोपेची योग्य वेळ पाळा.
आहाराची काळजी घ्या
दिवसभर उर्जेने परिपूर्ण राहण्यासाठी, आपला आहार देखील त्यानुसार असावा. सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्रथिने, कार्बोहायड्रेट, ऊर्जा युक्त आहार घ्या. यामुळे तुम्हाला झोप लागणार नाही. आणि तुम्ही दिवसभर एनर्जेटिक असाल.
भरपूर पाणी प्या
पाणी हा ऊर्जेचा सर्वात मोठा आणि सहज उपलब्ध स्रोत आहे. भरपूर पाणी प्या कारण शरीरात पाण्याची कमतरता जाणवू लागताच शरीराला थकवा जाणवू लागतो.
दररोज व्यायाम करा
'निरोगी शरीरात निरोगी मन वसते', या मूल्याचे पालन करत रोज व्यायामाची सवय लावा. व्यायाम हा स्ट्रेस बस्टर म्हणूनही काम करतो.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्त्वाच्या बातम्या :























