Health Tips : 'अशा' प्रकारे कॉफी साठवून ठेवा; सुगंध आणि चव कधीही कमी होणार नाही
How To Store Coffee : भारत आणि परदेशातील बहुतेक लोक त्यांच्या दिवसाची सुरुवात कॉफीने करतात. कॉफी दीर्घकाळ ताजी ठेवण्यासाठी तुम्ही येथे दिलेल्या काही टिप्स वापरून पाहू शकता.

How To Store Coffee : आपल्यापैकी अनेकांना सकाळी लवकर उठल्यानंतर सर्वात आधी कॉफी (Coffee) पिण्याची सवय असते. ज्याप्रमाणे चहाप्रेमींची संख्या आहे त्याच तुलनेत कॉफीप्रेमी देखील आहेत. कॉफी पिणारे देखील चव वाढवण्यासाठी महागडया कॉफी बीन्स वापरतात. या लोकांना कॉफीचे इतके व्यसन असते की त्यांचा दिवस कॉफीशिवाय सुरूच होत नाही. पण, दैनंदिन जीवनात इतकी महत्त्वाची असणारी कॉफी खरंच दीर्घकाळ टिकवता येते का? याच साठी कॉफी दिर्घकाळ टिकावी यासाठी आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहोत.
'अशा' प्रकारे कॉफी स्टोअर करून ठेवा, दीर्घकाळ टिकेल
कॉफी नीट साठवली नाही तर तिचा सुगंध काही दिवसांतच नाहीसा होतो आणि चवही कडू होते. एवढेच नाही तर त्याचा पोतही बिघडतो. पण जर तुम्ही कॉफी नीट साठवून ठेवली तर ती दिर्घकाळ टिकते. या ठिकाणी कॉफी कशी साठवायची ते जाणून घेऊयात जेणेकरून त्याची चव आणि सुगंध दीर्घकाळ टिकून राहील.
कॉफी हवाबंद डब्यात ठेवा
आपल्या सर्वांनाच माहीत आहे की कोणताही पदार्थ हवाबंद डब्यात ठेवला तर तो बराच काळ टिकून राहतो. त्यामुळे कॉफी नेहमी हवाबंद डब्यात ठेवा. कॉफी कोणत्याही कंटेनरमध्ये ठेवण्यापूर्वी, कंटेनर स्वच्छ आहे का? त्यलाा कोणताही वास येत नाहीये ना? याची खात्री करून घ्या. तुमचा कॉफी कॅन स्टोव्हजवळ ठेवू नका, जास्त उष्णता कॉफी खराब करू शकते.
थंड ठिकाणी साठवा
कॉफी साठवताना एक गोष्ट लक्षात घ्या की, कॉफीचा डबा हा जिथे कमीत कमी सूर्यप्रकाश असेल अशा ठिकाणी ठेवा. थंड ठिकाणी ठेवल्यास त्याची चव आणि सुगंध टिकून राहील. तसेच, कॉफी स्टोर करताना दोन प्रकारच्या कॉफी एकत्र ठेवू नका. अनेक वेळा लोक भाजलेली कॉफी आणि कॉफी पावडर एकत्र ठेवतात. यामुळे दोघांचेही नुकसान होईल.
मसाल्यांपासून दूर रहा
कॉफी स्टोर करताना ती कोणत्याही मसाल्यांपासून तसेच मसाल्याच्या बॉक्सपासून दूर ठेवा. कारण, कॉफी आपल्या आसपासचा सुगंध फार लकर शोषून घेते. त्यामुळे कॉफीची स्वत:ची चव कमी कमी होत जाते.
कॉफी बीन्स अधिक चवदार
कॉफी पावडर घेण्याऐवजी तुम्ही कॉफी बीन्स खरेदी करू शकता. यासाठी तुम्हाला कॉफी मशीन लावण्याचीही गरज भासणार नाही. जेव्हा तुम्हाला कॉफी प्यायची असेल तेव्हा कॉफी बीन्स भाजून घ्या, पावडर बनवा आणि थेट वापरा.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
