Health Tips : झटपट वजन कमी करण्यासाठी खजूर फायदेशीर! जाणून घ्या खाण्याची पद्धत
Health Tips : ड्रायफ्रूट्समधील खजूर हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. खजूर खाल्ल्याने शरीराला झटपट ऊर्जा मिळते.
Health Tips : खरंतर ड्रायफ्रूट्स हे आरोग्याच्या दृष्टीने कितीही फायदेशीर असले तरी ते प्रत्येकालाच आवडत नाहीत. याच ड्रायफ्रूट्समधील खजूर हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. खजूर (Dates) खाल्ल्याने शरीराला झटपट ऊर्जा मिळते. खजूरचे तसे अनेक फायदे आहेत. पण, सर्वात महत्वाचं म्हणजे खजूर खाल्ल्याने वजन कमी होते. मात्र, खजूर खाण्याची योग्य वेळ आणि खजूर कसे खायचे हे तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे. खजूरमध्ये आहारातील फायबर, प्रथिने, लोह, मॅग्नेशियम आणि इतर अनेक आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. हे पोषक घटक वजन कमी करण्यात खूप मदत करता
खजूर खाण्याची योग्य पद्धत :
वजन कमी करण्यासाठी खजूर कसे खावे?
1. खजूरमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. ते खाल्ल्याने पचनशक्ती मजबूत होते.
2. खजूर खाल्ल्याने चयापचय गतिमान होते. यामुळे तुमची कॅलरी जास्त बर्न होते.
3. खजूर खाल्ल्यानंतर जास्त वेळ भूक लागत नाही. पोट भरलेले राहते आणि तुम्ही अस्वास्थ्यकर पदार्थ खाणे टाळा.
वजन कमी करण्यासाठी कोणत्या वेळी खजूर खावे?
वजन कमी करण्यासाठी खजूर खात असाल तर लक्षात ठेवा खजूर सकाळी किंवा दिवसभरात खावेत. सकाळी खजूर खाल्ल्याने दिवसभरातील कॅलरी नियंत्रणात राहते. रात्री खजूर खाणे टाळावे. खजूर रात्री पचायला जड जाते. सकाळी खजूर खाल्ल्याने मेटाबॉलिज्म वाढते. त्यामुळे खजूर सकाळीच खावे.
वजन कमी करण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी खजूर खा. यासाठी 3-4 खजूर रात्री भिजत ठेवा आणि सकाळी नाश्त्यात इतर ड्रायफ्रुट्ससोबत खा. खजूर गोड असतात, तुम्ही ते शेक, स्मूदी किंवा कोणत्याही प्रोटीन ड्रिंक्समध्ये मिसळून पिऊ शकता. होय, खजूर खाण्यापूर्वी, त्यांना किमान 3-4 तास भिजवा.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :