High Cholesterol : कोलेस्ट्रॉल वाढल्यावर पायांमध्ये दिसतील ही लक्षणं, दुर्लक्ष करु नका
Symptoms of High Cholesterol : शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढल्यावर अनेक आजारांना आमंत्रण मिळते. त्यामुळे याच्या लक्षणाकडे वेळीच लक्ष द्यायला हवं. कसं ते जाणून घ्या.
Health Tips : शरीरातील वाढलेले कोलेस्ट्रॉल (High Cholesterol) अनेक आजारांना कारणीभूत ठरु शकते. वाढत्या कोलेस्ट्रॉलमुळे हदयासंबंधित आजार होण्याचा धोका अधिक असतो. हदयविकाराची शक्यता असते. त्यामुळे कोलेस्ट्रॉल वेळीच नियंत्रणात आणणं गरजेच आहे. त्यामुळे याकडे मुळीच दुर्लक्ष करु नका. शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रणात आहे की नाही हे कसं ओळखाल ते जाणून घ्या. हाय कोलेस्ट्रॉलची लक्षणं आणि नियंत्रणात आणण्याच्या टिप्स वाचा सविस्तर.
कोलेस्ट्रॉल वाढल्यावर पायांमध्ये दिसतील ही लक्षणं
- जर तुमच्या पायाचे तळवे अधिक थंड पडतं असतील, तर हे एक हाय कोलेस्ट्रॉलचं लक्षणं असू शकतं. हा त्रास तुम्हाला कोणत्याही मोसमात होऊ शकतो.
- पायांच्या त्वचेचा रंग बदलणे हा सुद्धा शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढल्याचा इशारा ठरू शकतो.
- शरीरात कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे पाय दुखण्याचा त्रास उद्धभवू शकतो. त्यामुळे पायदुखीकडे दुर्लक्ष करु नका.
- रात्री झोपताना पायात पेटके येणे हे सुद्धा कोलेस्ट्रॉल वाढल्याचं लक्षणं असू शकतं.
कोलेस्ट्रॉल नियंत्रणात आणण्यासाठी काही टिप्स
शरीरातील वाढलेलं कोलेस्ट्रॉल नियंत्रणात आणण्यासाठी डाइट आणि जीवनशैलीमध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे.
- कोलेस्ट्रॉल नियंत्रणात आणण्यासाठी नियमित व्यायाम करा.
- पोषक आहार घ्या. आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा.
- चरबीयुक्त पदार्थांचे सेवन टाळा.
- मद्यपान आणि धुम्रपान टाळा.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :
- High Cholesterol : कोलेस्ट्रॉल वाढलंय? 'या' गोष्टींपासून दूर राहा, पाहा यादी
- Heart Health : पुरुषांमध्ये हदयविकाराचा धोका अधिक, काय आहे यामागचं कारण? हे वाचा
- Thyroid : थायरॉइड झाल्यावर चहा पिणं योग्य? जाणून घ्या सविस्तर
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )