Healthy Fruits : पोषक तत्त्वांचा खजिना किवी; दररोज 1 किवी खाणं आरोग्यासाठी गुणकारी
Health Benefits of Kiwi : हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी रोज एक किवी खावी. किवी खाल्ल्याने इम्यून सिस्टम चांगली होते
Health Benefits of Kiwi : हिवाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी रोज एक किवी खावी. किवी खाल्ल्याने इम्यून सिस्टम चांगली होते. किवीची चव देखील चांगली असते. जाणून घेऊयात किवी फळामध्ये असणारी पोषक तत्वे-
किवीमध्ये असणारी पोषक तत्वे (Kiwi Nutrition)
किवीमध्ये पोटॅशियम मोठ्या प्रमाणात असते. तसेच किवीमध्ये कॅलरीज देखील असतात. फिटनेसकडे विशेष लक्ष देणारे लोक रोज एक किवी फळ खातात. किवीमध्ये केळीपेक्षा जास्त कॅलरीज आणि पोटॅशियम आहे. एका किवीमध्ये जवळपास 85 मिलीग्रॅम व्हिटॅमिन C असतं. याशिवाय व्हिटॅमिन के आणि ई यांनीसुद्धा हे फळ परिपूर्ण आहे. आरोग्यासाठी हे फळ अतिशय लाभदायी आहे. किवी खाल्ल्याने पचन शक्ति वाढते. आयर्न आणि फॉलिक अॅसिड असते ज्यामुळे शरीर निरोगी राहते. किवा खाल्ल्याने त्वचेवर देखील ग्लो येतो. तसेच किवाने हाडे देखील मजबूत होतात. कीवी खाल्ल्याने किवी मानसिक तणाव कमी होतो. किवी खाल्ल्याने रक्तातील ग्लूकोजचे प्रमाण कमी होते.
किवीमध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात आहे. व्हिटॅमिन सी हे शरीरासाठी अत्यंत आवश्यक असतं. हे हाडं, त्वचा आणि रक्त वाहिन्यांचं आरोग्य उत्तम राखण्यासाठी मदत करतात. याचं प्रमाण कमी झाल्यामुळे रक्ताची कमतरता, हाडांच्या समस्यांचा सामना करावा लागतो. व्हिटॅमिन सी शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी मदत करतं. अनेक संशोधनांमधून समोर आलेल्या निष्कर्षांनुसार, व्हिटॅमिन सी सूर्याच्या प्रखर किरणांमुळे त्वचेला होणाऱ्या नुकसानापासून बचाव करतं.
(टिप : वरील बाबी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. ABP माझा यातून कोणताही दावा करत नाही.)
संबंधित बातम्या
Weight Loss: नाश्ता करताना 'या' चुका टाळा, अन्यथा लठ्ठपणाचे व्हाल शिकार