Health Tips : हेडफोन्समुळे कानाच्या पेशींचं नुकसान होऊ शकतं; वारंवार होणारा त्रास टाळण्यासाठी 'हे' उपाय करा
Headphone Uses : लोकांना हेडफोन, इअरफोन लावून बोलणे आणि गाणी ऐकणे आवडते. हेडफोन काही काळासाठी ठीक आहे. पण दीर्घकाळ वापरणे धोकादायक ठरू शकते.

Headphone Uses : डोळे, नाक, कान हे शरीराचे महत्त्वाचे अवयव मानले जातात. या इंद्रियांमुळे आपल्याला आजूबाजूला, देशात आणि जगात काय चाललं आहे याची माहिती मिळते. यातील कान हा महत्त्वाचा अवयव आहे. पण आजकाल मोबाईलचा वापर ज्या पद्धतीने वाढत चालला आहे. त्यामुळे मेंदूवर त्याचा परिणाम झपाट्याने वाढला आहे. लोक तासनतास मोबाईलवर गाणी ऐकतात. यासाठी इअरफोन, हेडफोन आणि इअरबडचा वापर केला जातो. पण हेडफोन लावून सतत गाणी ऐकणं कानांसाठी किती नुकसानकारक आहे हे तुम्हाला माहीत आहे का?
कायमचे बहिरे होऊ शकता
हेडफोन तुमच्या कानाला इजा करू शकतात. कानाच्या आतील भागात लहान पेशी असतात. ते ऐकण्यासाठी संवेदनशील रिसेप्टर्स म्हणून काम करतात. हेडफोन्सच्या मोठ्या आवाजाच्या जास्त किंवा तीव्र असण्यामुळे कालांतराने नुकसान होऊ शकते. मोठा आवाज ऐकल्यानंतर काही काळ कानांना आराम दिला तर ते बरे होऊ शकतात. पण जर तुम्ही सतत गाणी ऐकत राहिल्यास कायमचा बहिरेपणा येतो.
कमी आवाजाचे हेडफोनसुद्धा नुकसानकारक
डॉक्टरांचं म्हणणं आहे की, काही केसेसमध्ये, एखाद्याच्या कानाला इजा होण्यासाठी हेडफोनचा आवाज खूप मोठा असण्याची गरज नाही. इअरबड्स किंवा हेडफोन्स वापरून मध्यम आवाजात ऐकण्यामुळेही कालांतराने ऐकण्याच्या समस्या उद्भवू शकतात. याचं कारण असं की कानांना होणारे नुकसान केवळ आवाजाच्या तीव्रतेपुरतेच मर्यादित नाही, तर अनेक काळ हा त्रास राहतो.
लक्षणं आणि उपाय
कानात कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास त्याची लक्षणेही दिसतात. यामध्ये कानात वाजणे, विविध प्रकारचे आवाज येणे, मोठ्याने बोलणे ऐकण्यात अडचण जाणवणे, कमी आवाजाचा आवाज ऐकू न येणे. ऐकण्याची ही समस्या दूर होऊ शकते, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. पण त्यासाठी इअरबड्स, इअरफोन्स किंवा हेडफोन्स कमी कालावधीसाठी वापरणं गरजेचं आहे. जास्त तास कानांना आराम द्या. कमी आवाजात गाणी ऐका. काही समस्या असल्यास ताबडतोब डॉक्टरांना भेटा. असे केल्याने तुमच्या कानांचं होणारं नुकसान कमी होऊ शकतं.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :


















