(Source: Poll of Polls)
Hair Care Tips : वयाच्या 25 व्या वर्षी केस का पांढरे होऊ लागतात? 'ही' कारणे जाणून घ्या
Hair Care Tips : केस पांढरे होणे ही वाढत्या वयाशी संबंधित प्रक्रिया आहे, परंतु जेव्हा लहान वयात ते पांढरे होऊ लागतात.
Hair Care Tips : मधुमेह, कोलेस्ट्रॉल आणि हृदयविकारांप्रमाणेच केसांशी संबंधित समस्यांचं प्रमाणही हळूहळू वाढत चाललं आहे. काहींच्या केसांत (Hair Care Tips) कोंडा होतो तर काहींचे केस सतत तुटतात. पण, आपल्यापैकी अनेकजण अकाली केस पांढरे होण्याच्या समस्येने त्रस्त आहेत. मुलांमध्येही ही समस्या दिसून येतेय. लहान वयात केस पांढरे झाल्याने फक्त लूकच खराब होत नाही तर आपला आत्मविश्वासही कमी होतो. केस पांढरे होण्याच्या भीतीने अनेकजण केसांन मेहंदी आणि कलर लावणं पसंत करतात.
पण, जर तुमचे केस 20 ते 25 वर्षीच पांढरे होऊ लागले तर ही खरोखरच त्रासदायक गोष्ट आहे. आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, लहान वयातच केस पांढरे होऊ लागतात, तेव्हा शरीरात सर्व काही ठीक होत नसल्याचे समजू शकते. हे काही समस्येमुळे होत आहे.
'या' कारणांमुळे केस पांढरे होतात
हार्मोनल असंतुलन
शरीरातील हार्मोनल असंतुलनामुळे केसांवरही परिणाम होतो, असे त्वचा आणि केसांशी संबंधित आजारांमधील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यामुळे तुमच्या केसांचा पोत खराब होतो किंवा ते अकाली राखाडी रंगाचे देखील होऊ शकतात.
अनुवांशिक कारणे
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, मधुमेहाप्रमाणे केसांची समस्या देखील अनुवांशिक असू शकते. जर कुटुंबात केस पांढरे होण्याचा इतिहास असेल तर तो कुटुंबातील इतर सदस्यांनाही होऊ शकतो. ज्या कुटुंबातील पालकांचे केस लवकर पांढरे झाले आहेत, त्यांच्या पुढच्या पिढ्यांचे केसही काळापूर्वीच पांढरे होऊ लागतात.
ही सुद्धा कारणे आहेत
- अति ताण घेणे
- केमिकल हेअर प्रोडक्ट्स
- धूम्रपानाची सवय
- सूर्यप्रकाशाच्या दीर्घकाळ संपर्कामुळे केसांचे नुकसान होते
संरक्षण कसे कराल?
काही वेळा शरीरातील व्हिटॅमिन बी 12 ची पातळी कमी होते, त्यामुळे केस पांढरे होतात, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. केस निरोगी आणि काळे ठेवण्यासाठी व्हिटॅमिन बी 12 असलेले पदार्थ खा. तुमच्या आहारात अंडी, एवोकॅडो, फ्लेक्ससीड्स आणि भोपळ्याच्या बियांचा वापर करा. यासाठीच केसांची योग्य काळजी घेणं गरजेचं आहे. तसेच, कमी वयात जर तुमचे केस लवकर पांढरे होत असतील तर वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधा.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
Health Tips : हिवाळ्यात वाढलेला कोलेस्ट्रॉल कमी करायचाय? 'या' 5 गोष्टींचा आहारात समावेश करा