Alia Bhatt : आलिया भट सारखा फिटनेस हवाय? फॉलो करा या टिप्स
आलियासारखा (Alia Bhatt) फिटनेस हवा असेल तर तुम्ही हे फिटनेस रूटिन फॉलो केले पाहिजे.
Alia Bhatt Fitness Mantra : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt) तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देते. आलिया सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. तिचे वर्क आऊट करतानाचे फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करते. आलियाचे इंस्टाग्रामवर 58.1 मिलियन फॉलोवर्स आहेत. तिचे यूट्यूब चॅनल देखील आहे. आलियासारखा फिटनेस हवा असेल तर तुम्ही हे फिटनेस रूटिन फॉलो केले पाहिजे.
आलियाचं फिटनेस रूटिन
आलिया रोज सकाळी उठल्यानंतर एक ग्लास लिंबू पाणी पिते. ती फिटनेस रूटिंन फॉलो करते ज्यामध्ये ट्रेनिंग डान्स, कार्डियो, स्विमिंग आणि योगा यांचा समावेश आहे. तसेच ती रनिंग, फंक्शनल ट्रेनिंग आणि किकबॉक्सिंग हे देखील करते. रिपोर्टनुसार आलिया वर्क-आऊटनंतर लिंबू पाणी किंवा नारळ पाणी पिते.
आलियाचा नाश्ता-
पोहे, सँडविच तसेच साऊथ इंडियन पदार्थ आलिया नाश्त्यामध्ये खाते.
दुपारचे जेवण
दुपारी आलिया सॅलेड, पोळी आणि वरण हे खाते.
रात्रीचे जेवण
रात्री आलिया दही भात खाते किंवा सूप पिते.
View this post on Instagram
अभिनय क्षेत्रामध्ये येणाआधी आलियाचं फिटनेसकडे लक्ष नव्हतं. तिचं वजन देखील जास्त होतं. आता ती फिटनेसकडे विशेष लक्ष देऊन जंक फूड, गोड पदार्थ, चिझ, साखर इत्यादी गोष्टींचा समावेश आहारात करत नाही.
संबंधित बातम्या
- 'पुष्पा'नंतर आता अल्लू अर्जुनची चाहत्यांना आणखी एक भेट; यावर्षी 'हा' चित्रपट होणार रिलीज
- Actress Childhood Photo : 'या' क्यूट मुलीला ओळखलं? सध्या आहे बॉलिवूडची 'एंटरटेन्मेंट क्विन'
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha