'पुष्पा'नंतर आता अल्लू अर्जुनची चाहत्यांना आणखी एक भेट; यावर्षी 'हा' चित्रपट होणार रिलीज
अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) लवकरच 'अला वैंकुटापुर्रामुलू' (Ala Vaikunthapurramuloo) हा चित्रपट पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
!['पुष्पा'नंतर आता अल्लू अर्जुनची चाहत्यांना आणखी एक भेट; यावर्षी 'हा' चित्रपट होणार रिलीज After Pushpa The Rise Allu Arjun Next Hindi Dubbed Film To Release on 26th January 'पुष्पा'नंतर आता अल्लू अर्जुनची चाहत्यांना आणखी एक भेट; यावर्षी 'हा' चित्रपट होणार रिलीज](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/17/feefbefd403817e8f0d36336f07597bb_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Allu Arjun Film Ala Vaikunthapurramuloo : प्रसिद्ध स्टार अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) 'पुष्पा: द राइज' (Pushpa : The Rise) या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. हा चित्रपट अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर 14 जानेवारी रोजी हिंदी भाषेत प्रदर्शित झाला आहे. तर 7 जानेवारी रोजी हा सिनेमा तेलुग, तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित झाला आहे. 2022 मध्ये या चित्रपटाचा दुसरा पार्ट प्रदर्शित होणार आहे. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्यासोबतच फहाद फासिलने देखील 'पुष्पा' या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. आता अल्लू अर्जुनचा लवकरच 'अला वैंकुटापुर्रामुलू' (Ala Vaikunthapurramuloo) हा चित्रपट पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
'अला वैंकुटापुर्रामुलू' या चित्रपटाच्या निर्मात्यांनी हा चित्रपट हिंदीमध्ये डब करून पुन्हा प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. हा चित्रपट 12 जानेवारी 2020 मध्ये तेलगू भाषेत प्रदर्शित झाला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर जवळपास 160 कोटी रूपये कमाई केली होती. आता 'अला वैंकुटापुर्रामुलू' हा चित्रपट हिंदीमध्ये डब करून 26 जानेवारी 2022 रोजी चित्रपटातगृहात पुन्हा प्रदर्शित करण्यात येणार आहे.
View this post on Instagram
'अला वैंकुटापुर्रामुलू' या चित्रपटामध्ये अल्लू अर्जुनसोबतच पूजा हेगडे, तब्बू आणि समुथीरकानी यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. अला वैंकुटापुर्रामुलू या चित्रपटाचं तेलगू व्हर्जन नेटफ्लिक्सवर प्रेक्षक कधीही पाहू शकतात.
संबंधित बातम्या
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)