Hair Care Tips : थंडीत कोरड्या केसांमुळे हैराण झालात? मुलायम केसांसाठी फॉलो करा 'या' टिप्स
थंडीमध्ये त्वचेची आणि केसांची (Skin and Hair Care) विशेष काळजी घेतली पाहिजे. थंडीत हवेमुळे केस कोरडे होतात. प्रदुषण आणि केसांची निगा न राखणे या कारणांमुळे केस गळतीला सामोरे जावे लागते.
![Hair Care Tips : थंडीत कोरड्या केसांमुळे हैराण झालात? मुलायम केसांसाठी फॉलो करा 'या' टिप्स follow these easy hair care tips in winters Hair Care Tips : थंडीत कोरड्या केसांमुळे हैराण झालात? मुलायम केसांसाठी फॉलो करा 'या' टिप्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/29/0f12c0a70007de67719ef79c2cc811cb_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Hair Care Tips for Winter: थंडीमध्ये त्वचेची आणि केसांची (Skin and Hair Care) विशेष काळजी घेतली पाहिजे. थंडीत हवेमुळे केस कोरडे होतात. प्रदुषण आणि केसांची निगा न राखणे या कारणांमुळे केस गळतीला सामोरे जावे लागते. त्यामुळे जर तुम्हाला थंडीमध्ये सिल्की केस हवे असतील तर या टिप्स फॉलो करा-
नारळाच्या तेलाने मसाज करा
थंडीत केसांमध्ये कोंडा होतो. तसेच केस कोरडे होतात. त्यामुळे थंडीमध्ये केसांना नारळाचे तेल लावावे. नारळाचे तेल केसांना लावण्याआधी गरम करून घ्यावे. गरम नारळाच्या तेलाने केसांची मालिश केल्याने केसांच्या मुळांमध्ये रक्ताभिसरण (Blood Circulation) चांगले होते. तसेच केस स्मूथ आणि सिल्की होतात.
सारखे केससारखे धुवू नका
थंडीमध्ये केससारखे धुवू नका. सारखे केस धुतल्याने केसांमधील नॅचरल ऑयल (Natural Oil) निघून जाते. त्यामुळे केस कोरडे होतात. केस अठवड्यातून दोन वेळाच धुवावेत. केस धुताना कंडिश्नरचा वापर करा. त्यामुळे केस मॉयश्चराइझ होतात.
अंड आणि एरंडेल तेलाचा हेअर मास्क वापरा
अंड तोडून ते फेटून घ्या. त्यानंतर 2-3 चमचे एरंडेल तेल टाका तुमचा हेअर मास्क तयार आहे. हा मास्क डोक्याला 30-40 मिनट लावून ठेवा. नंतर कोमट पाण्याने केस धुवा. या मास्कमुळे केस सिल्की होतात.
केसांना कोरफड जेल लावा
कोरफड जेल केसांना लावल्यामुळे केस गळती थांबते, केस दाट आणि मजबूत होतात. कोरफडीचा रस केसांना लावल्यामुळे केसातील कोंडा कमी होण्यास मदत होते. आठवड्यातून दोन ते तीन वेळा कोमट खोबरेल तेलात कोरफडीचा रस घालून केसांच्या मुळांना आणि केसांना लावल्याने केस सिल्की होतात.
टीप: वरील माहितीची पुष्टी एबीपी माझा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधे हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)