Bakrid 2022 : 'या' गोड पदार्थाने ईद बनवा अधिक स्पेशल; वाचा साहित्य आणि कृती
Bakrid 2022 : सण म्हटला की गोड पदार्थ आलेच. ईदला शीर खुर्मा, शीरमाळ, फिरणी, शाही तुकडा अशा विविध प्रकारची मिठाई बनवली जाते.
Bakrid 2022 : मुस्लिम बांधवांच्या पवित्र सणाला सुरुवात झाली आहे. सगळे बांधव या निमित्ताने एकमेकांना शुभेच्छा देऊन आनंद साजरा करतायत. रमजानचा संपूर्ण महिना ईदने संपतो. याच निमित्ताने ईदच्या दिवशी (ईद-उल-फित्र 2022) घरांमध्ये अनेक प्रकारचे पदार्थ शिजवले जातात. नातेवाईक एकेकांच्या घरी जातात. घरात गोड पदार्थ बनवले जातात. एकंदरीतच आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतं. सण म्हटला की गोड पदार्थ आलेच. ईदला शीर खुर्मा, शीरमाळ, फिरणी, शाही तुकडा अशा विविध प्रकारची मिठाई बनवली जाते. त्यामुळे तुम्हालाही तुमच्या शेवयामध्ये थोडा ट्विस्ट घालायचा असेल तर ही सोपी रेसिपी वापरून पहा.
गुलकंद शेवयांची खीर कशी बनवायची?
गुलकंद शेवयांची खीर ही अतिशय चविष्ट रेसिपी आहे. तुम्ही ईदच्या निमित्ताने घरी एकदम सोप्या पद्धतीने बनवू शकता. ईदच्या जेवणात तुम्ही डेझर्ट म्हणूनही सर्व्ह करू शकता.
गुलकंद शेवयांची खीर बनविण्यासाठी लागणारे साहित्य :
- तूप
- काजू
- कमी चरबीयुक्त दूध
- गुलकंद
- केशर
- साखर
- गुलाबाचे पाणी
गुलकंद शेवयांची खीर बनविण्यासाठी लागणारी कृती :
- ही डिश तयार करण्यासाठी, प्रथम एक पॅन घ्या.
- या पॅनमध्ये तूप गरम करून काजू भाजून घ्या.
- नंतर त्याच पातेल्यात उरलेल्या तुपात शेवया टाकून भाजून घ्या.
- आता त्यात दूध, गुलकंद, अर्धे काजू, बेदाणे आणि केशर घालून एक उकळी येऊ द्या.
- त्यात साखर घालून थोडा वेळ मंद आचेवर शिजू द्या.
- नंतर त्यात रोझ इसेन्स टाका, मिक्स करा आणि गॅस बंद करा.
- आता काजूने सजवा.
- थंड किंवा गरम सर्व्ह करा.
महत्वाच्या बातम्या :