Ashadhi Darshan Live : आषाढीला पंढरीत येऊन पांडुरंगाचं दर्शन घेऊ शकले नाहीत? घरबसल्या घ्या Live दर्शन
Ashadhi Ekadashi 2022 : काही कारणांमुळं अनेकांना पंढरीत येऊन आपल्या लाडक्या विठुरायाचं दर्शन घेणं शक्य होऊ शकत नाही. त्या भाविक भक्तांना घरबसल्या पांडुरंगाचं दर्शन घेण्याची सुविधा करण्यात आली आहे.
Ashadhi Ekadashi 2022 : आज आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi 2022) चा राज्यभर उत्साह आहे. कोरोनामुळे तब्बल दोन वर्षांनी पुन्हा एकदा भाविकांना आणि वारकऱ्यांना त्यांच्या विठुरायाचे थेट दर्शन होत आहे. विठुरायाला डोळे भरून पाहण्यासाठी सगळेच भाविक आतुर झाले आहेत. लाखोंच्या संख्येने लोक आज पंढरपुरात आले आहेत. दिंडी, वारी, विठुरायाची भजनं, अभंगांनी आज मंदिराचा परिसर दुमदुमला आहे. तरीही काही कारणांमुळं अनेकांना पंढरीत येऊन आपल्या लाडक्या विठुरायाचं दर्शन घेणं शक्य होऊ शकत नाही. त्या भाविक भक्तांना घरबसल्या पांडुरंगाचं दर्शन घेण्याची सुविधा करण्यात आली आहे.
ऑनलाईन लाईव्ह दर्शनासाठी क्लिक करा
पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी देवस्थानाकडून लाईव्ह थेट दर्शनाची सोय करण्यात आली आहे. यासाठी आपल्याला खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करायचं आहे. या लिंकवर क्लिक केल्यास आपल्याला विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन लाईव्ह घरबसल्या घेता येणार आहे.
कोरोनामुळं दोन वर्षांनंतर वारकरी मोठ्या प्रमाणात दाखल
कोरोनामुळं दोन वर्षांनंतर वारकरी मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत. यंदा मोठा उत्साह असून 10 लाखांपेक्षा जास्त वारकरी सहभागी झाले आहेत. आषाढीच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पंढरपुरात विठुरायाची महापूजा पार पडली. महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि त्यांच्या पत्नी लता यांच्या हस्ते विठ्ठल-रखुमाईची ही महापूजा करण्यात आली. यंदा बीडचे नवले दाम्पत्य ठरले मानाचे वारकरी ठरले. मुरली भगवान नवले (52) आणि जिजाबाई मुरली नवले (47) यांना मुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान मिळाला.
यंदा मोठा उत्साह, 10 लाखांपेक्षा जास्त वारकरी
विठुरायाच्या शासकीय महापूजेसाठी नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या संपूर्ण कुटुंबासह उपस्थित होते. यावेळी त्यांचे वडील संभाजी, एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता, मुलगा श्रीकांत आणि नातू देखील पूजेसाठी उपस्थित होते. पंढरपुरात नगरपालिका आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगाचे नियम पाळून महापूजा करावी लागली. निवडणूक आयोगाच्या काही अटी-शर्थींवरचा पूजेची परवानगी देण्यात आली होती.कोरोनामुळं दोन वर्षांनंतर वारकरी मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत. यंदा मोठा उत्साह असून 10 लाखांपेक्षा जास्त वारकरी सहभागी झाले असल्याची माहिती, मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.
इतर महत्वाच्या बातम्या
Ashadhi Ekadashi 2022 : बीडचे नवले दाम्पत्य ठरले मानाचे वारकरी; मुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान
Ashadhi Ekadashi 2022 : नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडली विठुरायाची पूजा!