Immunity Tips : प्रतिकारशक्ती वाढवायचीय, कोरोनाला दूर ठेवायचंय तर ‘हे’ पदार्थ खाणे टाळा!
Corona Virus : कोरोना टाळण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या गोष्टींच्या सेवनासोबतच, तुमच्या प्रतिकारशक्तीसाठी घातक ठरणाऱ्या गोष्टींपासून अंतर राखणेही खूप महत्त्वाचे आहे.

Omicron Variant : कोरोना (Corona) महामारीच्या काळात रोग प्रतिकारशक्ती वाढवी, यासाठी काय खावे हे आपल्याला माहीत आहेच. पण, काय खाऊ नये, हे मात्र आपण विसरतो. कोरोना टाळण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या गोष्टींच्या सेवनासोबतच, तुमच्या प्रतिकारशक्तीसाठी घातक ठरणाऱ्या गोष्टींपासून अंतर राखणेही खूप महत्त्वाचे आहे. दररोज आपण नकळत अशा पदार्थांचे सेवन करतो, जे सामान्यतः आपल्या आरोग्यासाठी चांगले नसतात. चला तर जाणून घेऊया अशा पदार्थांबद्दल, जे आपल्या इम्युनिटीसाठी घातक ठरू शकतात.
व्हाईट ब्रेड
व्हाईट ब्रेडमध्ये पौष्टिकतेचे प्रमाण कमी आणि कॅलरी जास्त असते, त्यामुळे वजन आणि लठ्ठपणाचा धोका वाढतो. म्हणूनच, जर तुम्हाला प्रतिकारशक्ती कमकुवत होण्यापासून वाचवायचे असेल, तर तुम्ही व्हाईट ब्रेडचे सेवन टाळावे.
फास्ट फूड
फास्ट फूडमधील जास्त मिठामुळे रोग प्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे फास्ट फूडचे सेवन टाळावे. फास्ट फूडमुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती देखील कमकुवत होते, त्यामुळे फास्ट फूडचे सेवन करू नये.
बिअर
बिअर आणि वाईनसारख्या अल्कोहोलमुळे संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. मद्य रक्तातील साखर, इन्सुलिन आणि तणाव संप्रेरक कॉर्टिसॉल देखील वाढवतात. त्यामुळे बिअरचे सेवन टाळावे.
बटाटा चिप्स
बटाट्याच्या चिप्समध्ये मीठ जास्त प्रमाणात असते. यासोबतच त्यामध्ये तेलही भरपूर असते. त्यांचे सेवन केल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊ शकते. त्यामुळे बटाट्याच्या चिप्सचे सेवन करू नये.
आईस्क्रीम
आईस्क्रीम हा व्होल फॅट क्रीम आणि दुधाचा पदार्थ आहे, ज्यात संतृप्त चरबीचे प्रमाण जास्त असते. याच्या सेवनानेही रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते. त्यामुळे त्याचे सेवन टाळावे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
संबंधित बातम्या :
- Covid-19 : Omicron variant दरम्यान, लवंग, मेथी आणि तुळस 'या' प्रकारे करा सेवन, घसादुखीही होईल दूर
- Omicron Variant: नखांचा रंग बदलणे असू शकते ओमायक्रॉनचे लक्षण, चुकूनही करू नका दुर्लक्ष!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
