Covid-19 : Omicron variant दरम्यान, लवंग, मेथी आणि तुळस 'या' प्रकारे करा सेवन, घसादुखीही होईल दूर
Health Tips : हिवाळ्यात घसा खवखवणे हे सामान्य लक्षण आहे. अशा वेळी, लवंग, मेथी आणि तुळससुद्धा तुम्हाला आराम मिळवून देऊ शकतात.
Omicron Variant : हिवाळ्यात घसा खवखवणे सामान्य लक्षण आहे. पण या कोरोना व्हायरसच्या काळात, जर तुमचा घसा खवखवत असेल, तर अशावेळी कोरोना झाल्याची शंका सहज मनात येते. तसेच, घसादुखीमुळे तुम्हाला अनेक समस्यांना देखील सामोरे जावे लागू शकते. हिवाळ्यात घसादुखीची समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येते. अशा वेळी लवंग, मेथी आणि तुळस हे घशातील खवखव दूर करण्यात मदत करू शकतात. घसा खवखवणे हे देखील ओमायक्रॉन (Omicron) चे एक लक्षण आहे. अशावेळी चाचणी तर करून घ्यावीच पण त्याचबरोबर आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत. यामुळेसुद्धा तुम्हाला घसादुखीपासून आराम मिळू शकतो.
हे घरगुती उपाय करा :
लवंग पावडर आणि मधाचा वापर -
जर तुम्हाला घशात दुखत असाल तर तुम्ही लवंग भाजून बारीक करून मधात मिसळून खाऊ शकता. दिवसातून तीन वेळा असे केल्याने घसादुखीपासून लगेच आराम मिळतो.
कोमट पाण्याने गार्गल करणे -
घसादुखीपासून सुटका मिळविण्यासाठी तुम्ही कोमट पाण्याने गुळण्या करू शकता. यामुळे तुम्हाला लवकर फायदा होईल. घसादुखीपासून सुटका मिळवण्यासाठी गरम पाण्यात एक चमचा मीठ टाकून उकळा. त्यानंतर गुळण्या करा. यामुळे घसादुखीपासून लवकर सुटका मिळेल.
मेथीने घसादुखीपासून आराम मिळेल -
मेथी हे घसादुखीसाठी औषध मानले जाते. यासाठी तुम्ही प्रथम 250 मिली पाण्यात मेथी 5 मिनिटे उकळा आणि नंतर गाळून प्या. असे केल्याने तुम्हाला खूप फायदा होईल.
तुळशीची पाने -
तुळशीची पाने थोड्या पाण्यात उकळून गाळून हे पाणी प्या. असे केल्याने घसादुखीपासून आराम मिळेल.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :
- Kitchen Tips : घरच्या घरी बनवा चविष्ट व्हेज गार्लिक सूप, लहान मुलांच्या आरोग्यासाठीही फायदेशीर!
- Beauty Tips : लिंबाच्या सालीचा असा करा वापर, फाटलेल्या ओठांपासून कोंड्यापर्यंतची समस्या होईल दूर
- Coffee Benefits: दररोज किती कॉफी पिणे योग्य? पाहा कॉफीचे फायदे
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )