(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Curd Eating Tips : आयुर्वेदिक पद्धतीने दही खाल्ल्याने अनेक आजारांपासून बचाव होईल
Curd Benefits : दही खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. आयुर्वेदानुसार पावसाळा वगळता प्रत्येक ऋतूत दही खाणं फायदेशीर ठरतं. दह्याचा पुरेपूर फायदा घ्यायचा असेल तर ते आयुर्वेदिक पद्धतीनं खावं.
Curd Benefits For Health : भारतात अनेकांच्या आहारात दही प्रामुख्याने आढळते. दही जरी दुकानात सहज मिळत असलं तरी गावासह शहरातही अनेक जण घरीच दही बनवतात. दही खाण्यासाठी स्वादिष्ट असतच पण ते पौष्टिकही आहे. दही साखर मिसळून खाल्लं जातं. याशिवाय कोशिंबीर बनवूनही दह्याचा आहारात समावेश केला जातो. दह्याचे आयुर्वेदिक फायदे आहेत. दह्याचे पांढरे दही आणि लाल दही असे दोन प्रकार आहे. आयुर्वेदानुासर कोशिंबीर बनवताना पांढऱ्या दह्यापेक्षा लाल दह्यांचा वापर योग्य मानला जातो. पांढरे दह्याचा रायता बनवून जेवणासोबत सेवन करणे चुकीचं आहे.
लाल दही 15 ते 20 वर्षांपूर्वी ग्रामीण भागात बनवलं जायचं. हे दही आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानलं जातं. लाल दही बनवणं हे पांढर दही बनवण्याच्या तुलनेत कठीण आहे. आता लाल दही फार कमी लोक बनवतात. सध्या पांढऱ्या दह्याचा वापर अधिक आहे. लाल दही बनवताना खडतर परिश्रम घ्यावे लागतात. अजूनही काही ग्रामीण भागात लाल दही बनवलं जातं. हे दही तयार करण्यासाठी दूध सुमारे आठ ते दहा तास मंद आचेवर शिजवलं जातं. यासाठी मातीची शेगडीची वापर केला जातो. मातीच्या शेगडीमध्ये दूध मंद आचेवर शिजवलं जातं. त्यानंतर हे दूध थंड करुन त्यापासून दही तयार केलं जातं.
पांढरे दही खाण्याची आयुर्वेदीक पद्धत
- आयुर्वेदानुसार पांढऱ्याचे दह्याचे सेवन जेवणासोबत करु नये. खास करुन पांढऱ्या दह्यामध्ये मीठ मिसळून खाऊ नये. यामुळे तुमचं पचन बिघडू शकतं.
- पांढरं दही नेहमी साखर किंवा मिसळून खावं.
- तुम्ही पांढरं दही सकाळी नाश्तानंतर आणि दुपारी जेवणा आधी साखर मिसळून खाऊ शकता.
- पांढऱ्या दह्यापासून तयार झालेला फ्रूट रायताही तुम्ही खाऊ शकता.
- पांढऱ्या दह्यामध्ये मीठ मिसळून खाल्यास तुमच्या शरीरावर पांढरे डाग येऊ शकतात.
- तोंडातील अल्सर दूर करण्यासाठी तुम्ही दिवसातून तीन ते तार वेळा पांढरं दही साखर मिसळून खाऊ शकता.
- पांढऱ्या दह्याचा उपयोग कढी बनवताना मुळीच करु नका. हे तुमच्या पचनसंस्थेसाठी त्रासदायक ठरेल.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :
- Health Tips : अंगावर खाज येत असेल तर करा 'हे' घरगुती उपाय; लगेच मिळेल आराम
- Orange Juice : लठ्ठपणा टाळायचा असेल तर संत्र्याचा रस पिणं बंद करा, 'हे' आहे कारण
- World Food Safety Day 2022 : जागतिक अन्न सुरक्षा दिन का साजरा केला जातो? खाण्याच्या 'या' चांगल्या सवयी लावा
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
Calculate The Age Through Age Calculator
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )