Health Tips : अंगावर खाज येत असेल तर करा 'हे' घरगुती उपाय; लगेच मिळेल आराम
Health Tips : उन्हाळ्यात घामामुळे शरीरात खाज येण्याची समस्या उद्भवते. कधी कधी बराच वेळ खाज सुटल्याने जळजळ होते आणि त्वचा लाल होते.
![Health Tips : अंगावर खाज येत असेल तर करा 'हे' घरगुती उपाय; लगेच मिळेल आराम home remedies for itching and rashes itching problem in summer marathi news Health Tips : अंगावर खाज येत असेल तर करा 'हे' घरगुती उपाय; लगेच मिळेल आराम](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/06/84062cf36bd478b283d044f2e03ea806_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Health Tips : जास्त उष्णता, ऊन आणि घाम यांमुळे शरीरात खाज येण्याची समस्या वाढते. उन्हाळ्यात, लोक अनेकदा बोचऱ्या उष्णतेची तक्रार करू लागतात, ज्यामध्ये शरीराला खूप खाज सुटते. अनेक वेळा उन्हाळ्यात घामामुळे फंगल इन्फेक्शन होऊन खाज सुटते. अशा वेळी घाबरण्याची गरज नाही. खाज सुटण्यापासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही औषधांऐवजी काही प्रभावी घरगुती उपायांचा अवलंब करू शकता. आज आम्ही तुम्हाला असे घरगुती उपाय सांगत आहोत, ज्याचा वापर केल्याने तुम्हाला खाज येण्यापासून आराम मिळेल.
बर्फाचा शेक द्या : जर तुम्हाला खूप खाज येण्याची समस्या जाणवत असेल, तर तुम्ही कापसाच्या कपड्यात बर्फाचे तुकडे टाकून त्याचा शेक घेऊ शकता. यामुळे खाज येण्यास आराम मिळेल. ज्या भागात तुम्हाला खाज येत आहे ती जागा दाबा. त्यामुळे खाज आणि सूजही कमी होईल.
कॅलामाइन लोशन : खाज येण्याची समस्या वाढल्यास डॉक्टर कॅलामाइन लोशन लावण्याचा सल्ला देतात. यामुळे खाज कमी होण्यास मदत होते. या लोशनने खाज येणाऱ्या भागाला काही सेकंद मसाज करा. तुमची समस्या दूर होईल.
खोबरेल तेल : जर तुमची त्वचा हायड्रेटेड राहिली तर खाजही कमी होते. यासाठी आंघोळीनंतर त्वचा कोरडी करा आणि नंतर त्वचेतून तेल सुकेपर्यंत खोबरेल तेलाने त्वचेला मसाज करा. दिवसातून दोनदा ही रेसिपी फॉलो करा. यामुळे खाजेपासून खूप आराम मिळेल.
एलोवेरा जेल : जर तुम्हाला खाज येत असेल तर त्या भागावर थोडेसे कोरफड जेल लावून मसाज करा. एलोवेरा जेल दिवसातून दोनदा लावल्याने खाज कमी होईल. एलोवेरा जेलमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात ज्यामुळे त्वचा मुलायम होते. या रेसिपीचा वापर केल्याने त्वचेची खाज सुटते.
लिंबाचा रस : लिंबाच्या रसामध्ये प्रतिजैविक घटक आढळतात, ज्यामुळे खाज शांत होते. लिंबाचा रस थोड्या पाण्यात मिसळून खाजलेल्या भागावर लावा, खूप आराम मिळेल.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्त्वाच्या बातम्या :
- Green Coffee : 'ब्लॅक कॉफी'नंतर आता 'ग्रीन कॉफी', जाणून घ्या फायदे
- Orange Juice : लठ्ठपणा टाळायचा असेल तर संत्र्याचा रस पिणं बंद करा, 'हे' आहे कारण
- Digestion : पचनशक्ती वाढवण्याचे आयुर्वेदिक उपाय, पोट राहील साफ
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)