UPSC Recruitment 2023 : सरकारी नोकरीची संधी, अर्ज करण्याची शेवटची तारीख कधी? संपूर्ण माहिती
UPSC Recruitment 2023 : केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून असिस्टंट डायरेक्टरसह अनेक पदांसाठी भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
UPSC Recruitment 2023 : नोकरीच्या शोधात (Job Vacancy) असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग (Union Public Service Commission) म्हणजेच यूपीएससी (UPSC) ने सहाय्यक संचालक आणि इतर अनेक पदांसाठी भरती (UPSC Assistant Director Recruitment 2023) जाहीर केली आहे. या भरतीसाठीची अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवार (Candidate) अधिकृत वेबसाइटला (UPSC Official Website) भेट देऊन अर्ज करू शकतात. केंद्रीय लोकसेवा आयोग (Union Public Service Commission) कडून भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
असिस्टंट डायरेक्टरसह अनेक पदांवर भरती
या भरतीसाठीची अर्ज प्रक्रिया 28 ऑक्टोबरपासून सुरु करण्यात आली असून इच्छूक उमेदवारांनी लवकरात लवकर अधिकृत वेबसाईटवर अर्ज (Union Public Service Commission Official Website) दाखल करा. इच्छुक उमेदवार यूपीएससी (UPSC) च्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर ऑनलाइन अर्ज दाखल करू शकतात. या भरतीअंतर्गत 46 पदांवर भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 16 नोव्हेंबर आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
अधिसूचनेत दिलेल्या माहितीनुसार, या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 नोव्हेंबर 2023 आहे.
रिक्त जागा तपशील
केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली असून या भरतीद्वारे 46 पदे भरण्यात येणार आहेत.
- स्पेशलिस्ट ग्रेड III : 7 पदे
- सहाय्यक संचालक : 39 पदे
- प्राध्यापक : 1 पद
- वरिष्ठ व्याख्याता (सीनियर लेक्चरर) : 3 पदे
तुम्हाला किती पगार मिळेल?
या भरतीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना पदानुसार वेतन स्तर 10 ते वेतन स्तर 13 पर्यंत वेतन मिळेल.
निवड प्रक्रिया कशी असेल?
या भरतीसाठीची निवड परीक्षा आणि त्यानंतर मुलाखतीद्वारे केली जाईल. निवड भरती चाचणी (RT) आणि मुलाखतीद्वारे भरतीमध्ये पात्र ठरण्यासाठी उमेदवाराने मुलाखतीच्या टप्प्यावर श्रेणीतील योग्यतेची किमान पातळी गाठणं आवश्यक आहे.
अर्ज फी
या भरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांना 25 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. उमेदवार फक्त SBI च्या कोणत्याही शाखेत रोखीने किंवा कोणत्याही बँकेच्या नेट बँकिंग सुविधेद्वारे किंवा व्हिसा, मास्टर, रुपे, क्रेडिट, डेबिट कार्ड, UPI पेमेंट वापरून दिले जावे. अधिक संबंधित तपशिलांसाठी उमेदवार UPSC ची अधिकृत वेबसाइट पाहू शकतात. महिला, एससी, एसटी, बेंचमार्क अपंगत्व असलेल्या उमेदवारांना फी भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :