SSC MTS notification 2021 : 10वी उत्तीर्णांसाठी नोकरीची सुवर्णसंधी, SSC कडून MTS परीक्षेची अधिसूचना जारी
या भरती प्रक्रियेद्वारे एमटीएस आणि हवालदारासह विविध पदांच्या 3 हजारांहून अधिक रिक्त पदांची भरती केली जाणार आहे.
SSC MTS Recruitment 2022: कर्मचारी निवड आयोगाने मंगळवारी 22 मार्च 2022 रोजी मल्टी-टास्किंग स्टाफ तसेच SSC MTS 2022 परीक्षेसाठी अधिसूचना जारी केली आहे. परीक्षा देण्यास इच्छुक असलेले सर्व उमेदवार अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वरून परीक्षा अधिसूचना म्हणजेच नोटीफिकेशन डाउनलोड करू शकतात. या भरती प्रक्रियेद्वारे एमटीएस आणि हवालदारासह विविध पदांच्या 3 हजारांहून अधिक रिक्त पदांची भरती केली जाणार आहे.
SSC कडून MTS परीक्षेची अधिसूचना जारी
एसएससी परीक्षेच्या कॅलेंडरनुसार टियर-1 संगणक आधारित परीक्षेसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत 30 एप्रिल 2022 आहे. SSC MTS 2022 टियर-1 परीक्षा जून 2022 मध्ये नियोजित आहे. दरम्यान, या परीक्षांच्या तारखा परिस्थितीनुसार बदलू शकतात. त्यामुळे, उमेदवारांना कोणत्याही बदलांबद्दल अपडेट होण्यासाठी वेळोवेळी अधिकृत वेबसाइट तपासत राहण्याचा सल्ला दिला जातो.
ऑनलाइन अर्ज कसा भरायचा?
1: इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट ssc.nic.in ला भेट द्या.
2: मुख्यपृष्ठावर, नवीन युझर्सच्या नोंदणीच्या पर्यायावर क्लिक करा आणि नंतर आवश्यक तपशील भरून नोंदणी करा.
3: पुन्हा मुख्यपृष्ठावर परत जा आणि लॉगिन विंडो पहा. तुमचा नोंदणी क्रमांक आणि पासवर्डसह लॉग इन करा
4: परीक्षा निवडा आणि अर्ज भरा
5: आवश्यक कागदपत्रे अपलोड करा, SSC MTS 2022 अर्ज फी भरा
6: पुढील चरणात, अर्ज सबमिट करा आणि अंतिम आवृत्तीची प्रिंटआउट घेण्यास विसरू नका.
पात्रता : निर्धारित कट-ऑफ तारखेला मान्यताप्राप्त बोर्डातून इयत्ता 10 (मॅट्रिक/ माध्यमिक/ हायस्कूल) परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार परीक्षेस बसण्यास पात्र आहेत.
कट ऑफ : आयोगाकडून त्याच्या नव्या अपडेटमध्ये कट-ऑफ तारखेची घोषणा करण्याची शक्यता आहे.
वयोमर्यादा : केंद्र सरकारच्या नियमांनुसार राखीव श्रेणीतील उमेदवारांना सूट दिली जाते. अर्ज करण्यासाठी किमान आवश्यक वय 18 वर्षे आहे आणि उच्च वयोमर्यादा 25 वर्षे आहे
उमेदवार अधिक तपशीलांसाठी वर दिलेली अधिकृत SSC वेबसाइट पाहू शकतात.
संबंधित बातम्या