RBI Recruitment 2022 : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये बंपर भरती, 'या' तारखेपासून करता येणार अर्ज
RBI Recruitment 2022 : रिझव्र्ह बँक ऑफ इंडियाकडून ग्रेड बी च्या पदांवर भरती केली जाईल. ज्यासाठी त्यांनी नोटीस बजावली आहे.
RBI Recruitment 2022 : बँकेत नोकरी शोधणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) ग्रेड बी पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी त्यांनी शॉर्ट नोटीसही जारी केली आहे. पात्र उमेदवार या भरतीसाठी 28 मार्च 2022 पासून बँकेच्या अधिकृत साइटवर ऑनलाइन अर्ज करू शकतील. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 एप्रिल 2022 निश्चित करण्यात आली आहे.
294 पदांची भरती
या भरतीद्वारे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये ग्रेड बी ची 294 रिक्त पदे भरली जाणार आहेत.
अशी असेल निवड प्रक्रिया
या भरतीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे केली जाणार आहे. लेखी परीक्षा 28 मे 2022 ते 6 ऑगस्ट 2022 या कालावधीत घेतली जाईल.
शैक्षणिक पात्रता
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेमधून संबंधित विषयात पदवी किंवा पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे किमान वय 21 वर्षे आणि कमाल वय 30 वर्षे असावे. सरकारी नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.
महत्वाची माहिती
सर्व पात्र उमेदवार 28 मार्च 2022 ते 18 एप्रिल 2022 या कालावधीत अधिकृत वेबसाइट rbi.org.in अधिकृत वेबसाईटवर या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतील. इतर कोणत्याही प्रकारे केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. या भरतीशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या माहितीसाठी उमेदवार अधिकृत साइटची मदत घेऊ शकतात.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- CISF मध्ये सामील होण्याची उत्तम संधी! बंपर भरती, कसा कराल अर्ज?
- SBI Bank Vacancy : पदवीधर तरुणांसाठी थेट मुलाखतीद्वारे बँकेत नोकरीची सुवर्ण संधी, जाणून घ्या अर्जाची शेवटची तारीख
- ECGC PO 2022 Recruitment : प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी 75 जागांची भरती, ऑनलाइन अर्ज आजपासून सुरु, वाचा संपूर्ण माहिती
- Mumbai Metro : मुंबई मेट्रोत नोकरीची सुवर्णसंधी; दोन लाखापर्यंत मिळेल पगार, असा करा अर्ज
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha