SSC GD Constable Exam 2025: एसएससी जीडी कॉन्स्टेबल भरतीचं नोटिफिकेशन आज येणार, 21 ते 69 हजारांपर्यंत पगाराची संधी
SSC GD 2025 Notification: स्टाफ सिलेक्शन कमिशन आज एसएससी जीडी कॉन्स्टेबल भरतीचं नोटिफिकेशन जारी करणार आहे. एसएससीच्या अधिकृत वेबसाईटवर तुम्ही सविस्तर माहिती पाहू शकता.
SSC GD 2025 Notice To Release Today नवी दिल्ली : कर्मचारी चयन आयोग म्हणजेच स्टाफ सिलेक्शन कमिशन जनरल ड्यूटी कॉन्स्टेबल भरती 2025 साठी नोटिफिकेशन जारी करणार आहे. त्यामुळं या भरतीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांची प्रतीक्षा संपणार आहे. आज जनरल ड्यूटी कॉन्स्टेबल परीक्षेचं नोटिफिकेशन जारी झाल्यानंतर जे उमेदवार अर्ज करणार आहेत. ते एसएससीच्या वेबसाईटवर जाऊन भेट देऊन ते पाहू शकतात.
स्टाफ सिलेक्शन कमिशननं यापूर्वी एक नोटीस जारी केलं होतं. त्यामध्ये संभाव्य तारखा देण्यात आल्या होत्या. त्यानुसार आज नोटिफिकेशन जारी केलं जाईल. तर, अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 5 ऑक्टोबर अशी असेल. परीक्षेचं आयोजन जानेवारी- फेब्रुवारीमध्ये होईल.
परीक्षेची तारीख अद्याप जारी झालेली नाही. मात्र, अधिकृत नोटिफिकेशनमध्ये त्यासंदर्भातील माहिती मिळेल. त्यासाठी उमेदवारांनी वेळोवेळी अधिकृत वेबसाईट पाहत राहणं आवश्यक आहे.
एसएससीनं जारी केलेल्या शॉर्ट नोटीसमध्ये संभाव्य तारीख सांगितली गेली होती. आज जारी होणाऱ्या नोटिफिकेशनमध्ये तारखा सांगण्यात येतील. अर्ज करण्याच्या तारखा, परीक्षा फी, अर्जातील दुरुस्ती आणि परीक्षेसंदर्भातील माहिती नोटिफिकेशनमधून मिळेल. नोटिफिकेशन आल्यानंतर अर्ज करण्यास सुरुवात होईल.
अर्ज कोण करु शकतं?
स्टाफ सिलेक्शन कमिशन जनरल ड्यूटी कॉन्स्टेबल भरतीद्वारे सीएपीएफ, एनआयए, एसएसएफ, रायफलमन जीडी, आसाम रायफल्ससाठी उमेदवारांची निवड केली जाते. अर्जदार दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. वयाची अट 18 ते 23 वर्ष इतकी आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या एससी, एसटी आणि दिव्यांग उमेदवारांना शुल्क द्यावं लागणार नाही. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 100 रुपये फी भरावी लागेल.
निवडप्रक्रिया राबवताना पहिल्यांदा संगणक आधारित चाचणी होईल. जी लेखी परीक्षा असेल. त्यानंतर शारीरिक क्षमता चाचणीत उमेदवारांना उत्तीर्ण व्हावं लागेल. यानंतर अंतिम निवड होईल. स्टाफ सिलेक्शन कमिशन द्वारे जनरल ड्यूटी कॉन्स्टेबल पदावर निवड झालेल्या उमेदवारांना 21 हजार ते 69 हजार रुपयांपर्यंत पगार मिळतो.
स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून दरवर्षी केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अखत्यारित असलेल्या निमलष्करी दलातील कॉन्स्टेबल्सच्या भरतीसाठी प्रक्रिया राबवली जाते. हजारो युवक या जाहिरातीची वाट पाहत असतात.
संबंधित बातम्या :
मोठी बातमी! रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, 5254 जागांसाठी भरती, पात्रता काय? कसा कराल अर्ज?
RBI : कर्ज घेणं सोपं होणार, UPI प्रमाणं ULI सुरु होणार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय