एक्स्प्लोर
RBI : कर्ज घेणं सोपं होणार, UPI प्रमाणं ULI सुरु होणार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय
Unified Lending Interface Update :आरबीआय कर्ज वितरण प्रणाली सोपी आणि सुलभ व्हावी म्हणून यूनिफाइड लेंडिंग इंटरफेस टेक्नोलॉजी प्लॅटफॉर्म आणणार आहे.
यूएलआय
1/5

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी यूपीआय प्लॅटफॉर्ममुळं पैसे पाठवण्याच्या क्षेत्रात मोठे क्रांतिकारी बदल झाले, असं म्हटलं. त्याच पार्श्वभूमीवर कर्ज वितरण प्रणालीत सुलभता आणण्यासाठी यूनिफाइड लेंडिंग इंटरफेसची निर्मिती करण्यात येणार असल्याचं दास यांनी म्हटलं.
2/5

भारताच्या रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी बंगळुरुत डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर अँड इमर्जिंग टेक्नॉलॉजीजच्या कार्यक्रमाला संबोधित केलं. यावेळी त्यांनी छोट्या आणि ग्रामीण कर्जदारांना कर्ज वितरणसाठी यूएलआय हा टेक मंच सुरु करणार असल्याचं म्हटलं.
Published at : 27 Aug 2024 12:18 PM (IST)
आणखी पाहा























