एक्स्प्लोर

खासगी क्षेत्रात नोकरी करणाऱ्या लोकांना 'या' आजारांचा धोका, बचाव करण्याचे मार्ग कोणते?

खासगी क्षेत्रात (Private Sector ) काम करणाऱ्या अनेक लोकांनी विविध अडचणींचा सामना करावा लागतो.  एक नवीन अहवाल समोर आला आहे.

Private Sector Job : खासगी क्षेत्रात (Private Sector ) काम करणाऱ्या अनेक लोकांनी विविध अडचणींचा सामना करावा लागतो.  एक नवीन अहवाल समोर आला आहे. यामध्ये खासगी नोकरदारांच्या संदर्भात माहिती दिली आहे. या अहवालात  खासगी नोकरी करणाऱ्या 70 टक्क्यांहून अधिक लोक जीवनशैलीशी संबंधित आजारांनी ग्रस्त आहेत. यामध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा आणि ताण यांसारखे आजार समाविष्ट आहेत. ज्यामुळं काम करणाऱ्या लोकांच्या जीवनावर वाईट परिणाम होत आहे. हे आजार का वाढत आहेत आणि ते टाळण्याचा मार्ग काय आहे ते जाणून घेऊया?

सर्वेक्षणात धक्कादायक खुलासा

माहितीनुसार, खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांवर अलीकडेच एक सर्वेक्षण करण्यात आले. त्यात असे दिसून आले की खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या 20 टक्के लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत. त्याच वेळी, 14 टक्के लोक उच्च रक्तदाबाच्या तक्रारीशी झुंजत आहेत. 6.3 कर्मचारी लठ्ठ आहेत, तर 3.2 टक्के लोकांमध्ये हृदयाशी संबंधित समस्या दिसून आल्या. याशिवाय, 1.9 टक्के लोकांमध्ये किडनीचा आजार आढळून आला. सर्वात चिंताजनक बाब म्हणजे 50 टक्क्यांहून अधिक कर्मचारी तणावाने ग्रस्त आहेत, ज्यामुळे हे आजार अधिक धोकादायक ठरत आहेत. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 63 टक्के लोकांनी कबूल केले की ते त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी वेळ काढू शकत नाहीत, ज्यामुळे समस्या वाढत आहेत.

खासगी नोकऱ्यांचे बदलते स्वरूप या आजारांना जबाबदार 

डॉक्टरांच्या मते खासगी नोकऱ्यांचे बदलते स्वरूप या आजारांना जबाबदार आहे. आजकाल 9 ते 10 तास ऑफिसमध्ये बसणे ही एक सामान्य गोष्ट बनली आहे. एकाच ठिकाणी जास्त वेळ काम केल्याने लठ्ठपणा आणि सांधेदुखीच्या तक्रारी वाढत आहेत. याशिवाय जंक फूड आणि अनियमित खाण्याच्या सवयींमुळे मधुमेह आणि उच्च रक्तदाब वाढत आहे. बरेच कर्मचारी रात्री उशिरापर्यंत काम करतात, ज्यामुळे झोपेचा अभाव होतो. झोपेचा अभाव केवळ ताणतणाव वाढवत नाही तर हृदय आणि मूत्रपिंडांवरही वाईट परिणाम करतो.

या समस्या देखील त्रासदायक आहेत

दिल्लीतील हृदयरोगतज्ज्ञ डॉ. प्रिया गुप्ता म्हणाल्या की बहुतेक लोक लॅपटॉप आणि मोबाईलवर काम करतात, ज्यामुळे डोळ्यांची कमजोरी आणि मानदुखीच्या तक्रारी सामान्य झाल्या आहेत. याशिवाय, कामाच्या ताणामुळे लोक व्यायाम किंवा योगा करण्यासाठी वेळ काढू शकत नाहीत, ज्यामुळे ही समस्या खूप वाढत आहे. तिने सांगितले की ताण कमी करण्यासाठी योगा आणि ध्यान करा. ऑफिसमध्ये दर २ तासांनी उठून ५ मिनिटे चालत जा. जर तुम्हाला छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे किंवा थकवा जाणवत असेल तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. हृदयाच्या आरोग्यासाठी नियमित तपासणी आवश्यक आहे.

महत्त्वाच्या बातम्या

नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवकांसाठी मोठी बातमी, रेल्वेमध्ये 1 हजार 421 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवकांसाठी मोठी बातमी, रेल्वेमध्ये 1 हजार 421 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
NEET मध्ये अपयशी झाली, तरीही जिद्द नाही सोडली, वयाच्या 21 व्या वर्षीच मिळवल्या पाच सरकारी नोकऱ्या, शुभांगीवर कौतुकाचा वर्षाव
NEET मध्ये अपयशी झाली, तरीही जिद्द नाही सोडली, वयाच्या 21 व्या वर्षीच मिळवल्या पाच सरकारी नोकऱ्या, शुभांगीवर कौतुकाचा वर्षाव
नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी गुड न्यूज, देशातील 7 राज्यात 12 लाख नवीन नोकऱ्या मिळणार, महाराष्ट्रात किती?  
नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी गुड न्यूज, देशातील 7 राज्यात 12 लाख नवीन नोकऱ्या मिळणार, महाराष्ट्रात किती?  
महाराष्ट्रातील युवकांसाठी नोकरीची मोठी संधी! SBI मध्ये तब्बल 9 हजार 766 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
महाराष्ट्रातील युवकांसाठी नोकरीची मोठी संधी! SBI मध्ये तब्बल 9 हजार 766 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Jaykumar Gore and Sushma Andhare: जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
Embed widget