MPSC Recruitment 2022 : लोकसेवा आयोगामध्ये 10वी उत्तीर्णांसाठी जागा रिक्त, 12 मे पूर्वी अर्ज करा
MPSC Recruitment 2022 : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) ने स्टेनोग्राफरसह विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 मे 2022 आहे.
MPSC Recruitment 2022 : MPSC म्हणजेच, महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं महाराष्ट्रात सरकारी नोकऱ्या शोधणाऱ्या तरुणांसाठी रोजगाराची चांगली संधी उपलब्ध करून दिली आहे.महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) ने स्टेनोग्राफरसह विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 मे 2022 आहे.
अर्जाची प्रक्रिया 22 एप्रिल 2022 पासून सुरू
तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) ने स्टेनोग्राफरसह विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 मे 2022 आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार mpsc.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन या पदांसाठी अर्ज करू शकतात. अर्जाची प्रक्रिया 22 एप्रिल 2022 पासून सुरू झाली आहे.
पात्रता निकष
या भरतीअंतर्गत स्टेनोग्राफरच्या या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे माध्यमिक शाळेचे प्रमाणपत्र आणि टंकलेखनाचा वेग चांगला असावा.
अर्ज फी
अर्ज करण्यास इच्छुक उमेदवाराचे वय 18 ते 28 वर्षे निश्चित करण्यात आले आहे. त्याच वेळी, सरकारी नियमांनुसार, राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी उच्च वयोमर्यादेत विशेष सवलत दिली जाईल.
येथे अर्ज करा
इच्छुक उमेदवार 12 मे 2022 पर्यंत mpsconline.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइनद्वारे या भरतीसाठी अर्ज करू शकतात. स्वारस्य असलेले उमेदवार भरतीशी संबंधित इतर माहितीसाठी अधिकृत अधिसूचना पाहू शकतात.
संबंधित बातम्या
Breaking News : रेकॉर्ड ब्रेक... MPSC चा सुपरफास्ट निकाल; मुलाखतीनंतर अवघ्या दोनच तासात लावली मेरिट लिस्ट
MPSC Exam 2021 : मोठी बातमी! एमपीएससी मुख्य परीक्षेचं प्रवेश प्रमाणपत्र जारी
MPSC Recruitment 2022 : MPSC कडून 250 पदांसाठी भरती सुरू, पात्रतेपासून अर्जाची शेवटची तारीख, सर्वकाही जाणून घ्या
CIC Recruitment 2022 : केंद्रीय सूचना आयोगात अधिकारी बनण्याची सुवर्णसंधी, 31 मेपर्यंत करु शकता अर्ज