दरमाह 1.60 लाखांपर्यंतचं मिळेल वेतन; सरकारी नोकरीची नामी संधी, कुठे कराल अर्ज?
Power Grid Corporation of India Ltd Recruitment 2022 : नॅशनल करियर सर्विसने पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये नोकरीची संधी. जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
Power Grid Corporation of India Ltd Recruitment 2022 : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. नॅशनल करियर सर्विसने पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (Power Grid Corporation of India Ltd) मध्ये सहाय्यक अभियंता प्रशिक्षणार्थी (Assistant Engineer Trainee) पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.
या भरती मोहिमेअंतर्गत एकूण 118 रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. पॉवर ग्रिडमधील (Power Grid) निवडलेले उमेदवार भारतात आणि परदेशात कुठेही पोस्ट केले जाऊ शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 फेब्रुवारी 2022 निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे उमेदवारांनी शेवटच्या तारखेची वाट पाहू नये. त्वरित अर्ज करावा. त्यांनी या पदांसाठी लवकरात लवकर अर्ज करावा. शेवटच्या दिवसांत वेबसाईट ओव्हरलोड झाल्यामुळे अर्ज करताना अडचणी येऊ शकतात.
पात्रतेचे निकष
अधिसूचनेनुसार (According to Notification) उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी पूर्ण केलेली असावी. निवड प्रक्रियेत GATE 2021 गुणांनाही खूप महत्त्व असेल.
वेतन
पदांसाठी देण्यात येणाऱ्या वेतनाबाबत अधिसूचनेत काहीही नमूद केलेले नाही.
असा करा अर्ज
NCS वेबसाइट www.ncs.gov.in च्या अधिकृत साइटला (Official Website) भेट द्या
होम पेजवरील 'जॉब सीकर' विभाग निवडा
त्या पृष्ठावरील आवश्यक सूचना शोधा आणि निवडा
अधिसूचना वाचा आणि 'लागू करा' या बटणावर क्लिक करा
अर्ज भरा आणि 'सबमिट' बटणावर क्लिक करा
नोंदणी फॉर्मची प्रिंट आऊट घ्या
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Maharashtra National Law University : महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीमध्ये रिसर्च असिस्टंट पदासाठी भरती; असा करा अर्ज
- Jobs : बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये अधिकारीपदासाठी बंपर भरती, जाणून घ्या सर्व माहिती
- Bank Job 2022 : सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये SO पदांसाठी मेगा भरती; पदवीधर अर्ज करू शकतात
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha