Jobs : बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये अधिकारीपदासाठी बंपर भरती, जाणून घ्या सर्व माहिती
Jobs in Bank : 'बँक ऑफ महाराष्ट्र'मध्ये 500 जागांसाठी भरती करण्यात येणार आहे. जाणून घ्या अर्ज प्रक्रिया आणि इतर माहिती
Jobs in Bank Of Maharashtra : सरकारी बँक असलेली बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. बँकेने Generalist Officer पदासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. Generalist Officer Scale-II and Scale-III या श्रेणीसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.
बँक ऑफ महाराष्ट्रमधील Generalist Officer Scale-II and Scale-III पदासाठी अर्ज करण्यासाठी जाणून घ्या सर्व माहिती.
>> पदाचे नाव : Generalist Officer ( Scale-II and Scale-III)
>> किती जागांसाठी भरती : 500 जागा
- Generalist Officer (Scale-II): 400 पदे
- Generalist Officer (Scale-III): 100 पदे
शैक्षणिक पात्रता:
> Generalist Officer (Scale-II) : अर्ज करणाऱ्या उमेदवारांने किमान 60 टक्क्यांसह कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी परीक्षा उत्तीर्ण केली असावी. अनुसूचित जाती/ जमातीच्या उमेदवारांसाठी आणि दिव्यांग उमेदवारांसाठी ही मर्यादा किमान 45 टक्के असणार आहे. उमेदवाराला किमान 3 वर्षांचा कामाचा अनुभव असावा.
> Generalist Officer (Scale-III): अर्ज करणाऱ्या उमेदवारांने किमान 60 टक्क्यांसह कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी परीक्षा उत्तीर्ण केली असावी. अनुसूचित जाती/ जमातीच्या उमेदवारांसाठी आणि दिव्यांग उमेदवारांसाठी ही मर्यादा किमान 45 टक्के असणार आहे. उमेदवाराला किमान 5 वर्षांचा कामाचा अनुभव असावा.
परीक्षा केंद्र :
लखनौ, पाटणा, रायपूर, दिल्ली एनसीआर, रांची, भोपाळ, चंदीगड, पणजी, अहमदाबाद, सुरत, गांधीनगर, बेंगळुरू, त्रिवेंद्रम, औरंगाबाद, मुंबई, नागपूर, पुणे, भुवनेश्वर, जयपूर, चेन्नई, हैदराबाद आणि कोलकाता.
अर्ज प्रक्रिया : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येईल
>> महत्त्वाच्या तारखा :
अर्ज करण्यास सुरुवात : 5 फेब्रुवारी 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 फेब्रुवारी 2022
परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची तारीख : 22 फेब्रुवारी 2022
परीक्षेची तारीख : 12 मार्च 2022
निकालाची तारीख : अद्याप जाहीर नाही
>> अर्ज शुल्क
सामान्य/ओबीसी प्रवर्ग : 1180 रुपये
आर्थिकदृष्ट्या मागास : 1180 रुपये
अनुसूचित जाती/ जमाती : 118 रुपये
महिला/दिव्यांग : निशुल्क
इच्छुक उमेदवारांना डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगद्वारे शुल्क भरता येईल.
>> वयोमर्यादा:
किमान वय: 25 वर्षे
कमाल वय: 35 वर्षे (स्केल-II)
कमाल वय: 38 वर्षे (स्केल-III)
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Bank Job 2022 : सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये SO पदांसाठी मेगा भरती; पदवीधर अर्ज करू शकतात
- Jobs: सरकारी बँकेत पदवीधरांना नोकरीची संधी, 'असा' करता येईल अर्ज
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha